astro tips for good job Esakal
संस्कृती

अनेक प्रयत्नांनंतरही Job मिळत नाही? मग ज्योतिष शास्त्रानुसार हे उपाय करून पहा

astro tips for good job: ज्योतिष शास्त्रानुसार काही उपाय केल्यास तुमची ग्रह स्थिती चांगली होण्यास आणि ग्रहदोष दूर होण्यास मदत होवू शकते. यामुळे नोकरी मिळण्याबाबतच्या अडचणी दूर होवू शकतात

Kirti Wadkar

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक चांगली नोकरी मिळावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र बऱ्याचदा आवश्यक ते सर्व गुण आणि कौशल्य असूनही अनेक प्रयत्नांनंतरही नोकरी Job काही मिळत नाही. Marath Astrology Tips what to do for getting good Job

विविध कंपन्यांमध्ये अर्ज देऊन चांगली मुलाखत होते मात्र नोकरीसाठी निवड काही होत नाही असं अनेकांसोबत झालं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार Astrology ग्रह स्थिती चांगली नसल्यास नोकरी Job मिळण्यास अडथळे निर्माण होवू शकतात.

ज्योतिष शास्त्रानुसार काही उपाय केल्यास तुमची ग्रह स्थिती चांगली होण्यास आणि ग्रहदोष दूर होण्यास मदत होवू शकते. यामुळे नोकरी मिळण्याबाबतच्या अडचणी दूर होवू शकतात. हे उपाय कोणते आहेत जाणून तुम्ही तुमच्या अडचणीवर तोडगा काढू शकता.

शनिदेवाची पूजा- जर तुम्ही अनेक दिवस प्रयत्न करूनही तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल तर तुम्ही शनिवारी शनिदेवाची पूजा करू शकता. तसचं 'ऊं शं शनैश्वराय नम:' मंत्राचा १०८ वेळा जप करा. यामुळे नोकरी मिळण्यासोबत इतर अडचणीदेखील दूर होतील.

गणेशाची करा पूजा- जर तुम्ही सतत इंटरव्ह्यू देत आहात, मात्र तरीही नोकरी काही लागत नाही. अशावेळी तुम्हाला विघ्नहर्ता गणेशाची पूजा करणं गरजेचं आहे. यासाठी उजव्या सोंडेच्या गणेशाच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर ७ किंवा ११ दूर्वा अर्पण कराव्या.

त्यानंतर गणेशासमोर लवंग आणि सुपारी ठेवून विधीवत पूजन करावं. त्यानंतर तुम्ही जेव्हा मुलाखतीला जाल तेव्हा गणेशासमोरील सुपारी आणि लवंग सोबत घ्या. यामुळे गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळतात आणि कामामध्ये यश मिळतं.

हे देखिल वाचा-

काली मातेचं पूजन करा- नोकरीतील अडचणी दूर करण्यासाठी काली मातेचे आशीर्वाद तुमच्या कामी येऊ शकतात. यासाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी शुभ्र कापडामध्ये काळे तांदूळ बांधून काली मातेला अर्पण करा. यामुळे नोकरी मिळण्यासंबधीच्या समस्या दूर होतील.

गायीला गूळ चणे द्या- हिंदू धर्मामध्ये गायीला महत्वाचं स्थान आहे. गायीमध्ये ३३ कोटी देवतांचा वास असल्याचं हिंदू धर्मात मानलं जातं.

यासाठी नोकरी मिळण्यासाठी इंटरव्हूला जाण्यापूर्वी एका पिठाच्या गोळ्यात चणे आणि गूळ मिसळून गायीला खायला द्या. यामुळे तुम्हाला इंटरव्हू चांगला जाईल आणि नोकरी पक्की होईल.

लिंबाचा उपाय- लिंबाचा वापर हा नजर लागू नये म्हणून केला जातो. जर खूप मेहनतीनंतरही नोकरी लागत नसेल तर मुलाखतीला जाताना एक लिंबू घेऊन त्यास चारही बाजुंनी लवंग लावा. हा लिंबू सोबत न्या. यामुळे नोकरी लागण्याची शक्यता वाढेल.

महादेवाची पूजा करा- सोमवार हा शंकर म्हणजेच महादेवाचा वार मानला जातो.. यासाठी दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्च दूध, कच्चे तांदूळ अर्पण करा. यामुळे महादेव मनोकामना पूर्ण करतात. यामुळे सर्व अडचणी दूर होऊन नोकरी लागेल.

टीप - हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. यात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा किंवा अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 317 अंकांनी वाढला; ऑटो-फार्मामध्ये खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?

'आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा अतरंगी टिझर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही समोर

Sangli Children : चौदा महिन्यांचा श्रवण व अडीच वर्षांचा करण खेळताना पाण्याच्या टाकीत डोकावले अन्..., आई घरकामात व्यस्त घडलं भयानक

चाहत्याच्या वागण्यामुळे राजामौली संतापले!

Heatwave Survey : ‘हिवताप’ सर्वेक्षण सातारा जिल्ह्यात गतिमान; डेंगीचे ५९, मलेरियाचे ३९, तर चिकनगुनियाचे १७ रुग्‍ण आढळले

SCROLL FOR NEXT