Margashirsh Mass 2022 Esakal
संस्कृती

Margashirsh Mass 2022 : येणारे नविन वर्षे भरभराटीच जाण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात 'या' गोष्टी करा

देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि सुख-समृद्धीसाठी बहुतेक विवाहित स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करतात.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो. ज्या प्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे त्याच प्रमाणे कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. या काळात भगवान विष्णूची मनोभावे पूजा केली जाते. या महिन्यात केलेल्या पुजेचे फळ सर्वात लवकर मिळते. एवढच नसून गीतेतसुद्धा श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन केले आहे.हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष महिन्यात दोन प्रमुख विवाह झाले आहेत , एक शिव आणि माता पार्वतीचा विवाह ,तर दुसरा श्री राम विवाह. पूर्वीच्या काळी वर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होत असे अशी मान्यता आहे.

देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि सुख-समृद्धीसाठी बहुतेक विवाहित स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करतात.यादिवशी स्त्रिया मनोभावे आणि विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करतात. महालक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते. जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते तेव्हा ती त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरते, अशी लोकांची श्रध्दा आहे.

चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या केल्याने पुढील संपूर्ण वर्षे हे आपल्याला भरभराटीच जाऊ शकतं.

1) भगवान श्रीकृष्णाचा प्रिय महिना म्हणजे मार्गशीर्ष आहे. स्कंद पुराणातील वैष्णवखंडानुसार मार्गशीर्ष हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना म्हणून केले आहे.

2) या काळात पहाटे लवकर उठून स्नान करून पूजा केल्याचे अनेक फायदे होतात. या महिन्यात नदीत स्नान करण्याचे विषेश महत्त्व आहे. जर हे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगेचे थेंब देखील टाकू शकता. यामुळे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.

3) एक वेळ भोजन करण्यामागे काय आहे कारण?

महाभारताच्या अनुशासन पर्वच्या एका अध्यायात असे म्हटले आहे की मार्गशीर्ष महिन्यात मनुष्याने एक वेळ भोजन करावे आणि ब्राह्मणाला त्याच्या क्षमतेनुसार भोजन द्यावे. असे करणारा व्यक्ती सर्व रोग आणि पापांपासून मुक्त होतो. जर एखाद्या व्यक्तीने या महिन्यात उपवास केला तर तो निरोगी होते असा उल्लेख देखील पुराणात मिळतो.

4) अन्नदान करावे.

कोणत्याही महिन्यात अन्नदान करणे उत्तम मानले जाते, पण या काळात त्याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. या महिन्यात अन्नदान केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT