Vastu Plant for Money esakal
संस्कृती

Vastu Plant for Money: घरात 'हे' रोप लावा अन् चुंबकासारखा पैसा ओढा

हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीची कृपा बरसते असं मानलं जातं. त्यामुळे माणसांची आर्थिक तंगी संपते. जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

Money Plant Vastu Shastra : वास्तू शास्त्रात झाडांचं विशेष महत्व सांगितलं आहे. काही विशेष कार्यांच्या सिद्धीसाठी वास्तूमध्ये काही खास रोपांचा उल्लेख करण्यात आला आहे. जर याला योग्य दिशा आणि जागेवर ठेवलं गेलं तर याचे परिणाम चमत्कारीक रित्या समोर येतात असं मानलं जातं.

असच एक रोप म्हणजे मनी प्लांट. जर हे रोप योग्य दिशेला आणि जागेवर लावलं तर याच्या चमत्काराने माणसाच्या जीवनात मोठे बदल घडतात.

यामुळे पैसा चुंबकाप्रमाणे या व्यक्तीकडे खेचला जातो असं म्हटलं जातं. वास्तूतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ज्यांच्याकडे मनी प्लांट लावलेलं असतं, त्यांच्याकडे आर्थिक संकटं येत नाहीत. घरात लक्ष्मी वास करते.

वास्तूशास्त्रात याला सुखसम़ृद्धीचं प्रतिक मानलं गेलं आहे. पण बऱ्याचदा हे रोप लावताना काही चुका केल्या जातात.

त्यामुळे विपरीत परिणामांना सामोरे जावं लागतं. एवढेच नाही तर बऱ्याच प्रकारच्या नुकसानालाही तोंड द्यावं लागते. तर जाणून घेऊया अशाच काही गोष्टी ज्यात काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

मनी प्लँट लावताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

  • मनी प्लँटचं रोप लावताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्या की, त्याची पाने जमीनीला स्पर्श करू नये. जर याची काळजी नाही घेतली तर आर्थिक नुकसान होऊ शकतं.

  • जर लावलेलं मनी प्लँट सुकलं किंवा पिवळं पडलं असेल तर ताबडतोब बदला. वास्तूत मनी प्लँटची पानं सुकणे किंवा कोमेजणे अशुभ मानलं जातं.

  • असं म्हणतात की, घरात लावलेलं मनी प्लँट कधीही दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये. किंवा बाहेरच्या व्यक्तीला स्पर्शही करू देऊ नये. यामुळे घरातली बरकत निघून जाते. घरातल्या सुख-समृध्दीचा नाश होतो.

  • जर घरातला मनी प्लँट जमीनीच्या दिशेने वाढायला लागला तर समजून घ्या की, वाय़फळ खर्च वाढला आहे. दोरी किंवा काठीच्या मदतीने वरच्या दिशेने वळवा. म्हणजे पैशात वृद्धी होते.

  • वास्तू शास्त्रानुसार मनी प्लँट कधीही पश्चिम किंवा इशान्य दिशेला लावू नये. यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम बघायला मिळतो. घरात आजारपण वाढतात.

  • वास्तू तज्ज्ञांचं मत आहे की, अग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला मनी प्लँट लावल्याने आर्थिक वृद्धी होते. या दिशेला शुभ मानलं गेलं आहे. यामुळे घरात सकारात्मकता येते.

  • वास्तूनुसार मनी प्लँटची देवाण घेवाण करणं शुभ नसतं. यामुळे शुक्र ग्रह नाराज होतो. आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update: भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT