Nag Panchami सकाळ डिजिटल टीम
संस्कृती

Nag Panchami 2022 : श्रावण महिन्यात कधी आहे नागपंचमी?

नागपंचमी आणि भगवान श्रीकृष्ण यांचं काय आहे नातं?

सकाळ डिजिटल टीम

नागपंचमी हा एक लोकप्रिय सण आहे. नाग हा भगवान शिव यांच्या गळ्यातील हार आहे. तर भगवान विष्णूंची शैय्या देखील आहे. लोकजीवनातही लोकांचा सापाशी खोल संबंध असतो. अनेक पवित्र कारणांमुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते.

नागपंचमी कधी आहे आणि शुभ मुहूर्त कोणता आहे ? (Nag Panchami 2022 Dete and Muhurat)

श्रावण शुक्ल पंचमी तारीख सुरू होईल ती तारीख : 2 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 5:14 वाजता. श्रावण शुक्ल पंचमी समाप्ती तारीख : 3 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 5:42 वाजता

नाग पंचमीचे नेमके महत्त्व काय आहे?

नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि व्यक्तीला काल सर्प दोषापासूनही मुक्ती मिळते. जीवनातील सर्व संकटे दूर होतात. भक्तांना अपेक्षित फळ मिळते.

नाग पंचमी आणि भगवान श्रीकृष्ण यांच काय आहे नातं ?

नागपंचमी पूजेचा एक प्रसंग भगवान श्री कृष्ण यांच्याशी निगडित आहे. बालकृष्ण जेव्हा आपल्या मित्रांसह खेळत होते तेव्हा त्यांना मारण्यासाठी कंस याने कालिया नावाच्या नागाला पाठवले होते. त्याने गावात दहशत पसरवली. लोकं घाबरु लागले. एकदा जेव्हा श्री कृष्ण आपल्या मित्रांसोबत खेळत होते तेव्हा त्यांचा चेंडू नदीत पडला. तो घेण्यासाठी कृष्ण नदीत उतरले तेव्हा कालियाने त्यांच्यावर आक्रमण केलं पण उलट कालियाला आपला जीव कसा वाचवावा हा प्रश्न पडला. त्याने कृष्णासमक्ष माफी मागितली आणि गावकर्‍यांना त्रास देणार नसल्याचं वचन देत तेथून निघून गेला. कालिया नागावर श्री कृष्ण यांचा विजय देखील नागपंचमी च्या रुपात साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT