Nag Panchami esakal
संस्कृती

Nag Panchami 2022: नागपंचमीच्या दिवशी चुकूनही 'या' पाच गोष्टी करू नका.

कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून "भगवान श्रीकृष्ण" सुरक्षित वर आले , तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.

सकाळ डिजिटल टीम

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.

यंदाच्या वर्षी 2 ऑगस्ट रोजी नागपंचमी आली आहे. चला तर मग आज आपण बघणार आहोत नागपंचमीला दिवशी कोणते काम करू नये.

1) नागपंचमीच्या दिवशी सापांना कोणताही त्रास देऊ नका, त्यांचा शारिरीक छळ होईल असे कुठलेच कृत्य करू नका आणि सापांच्या प्रतिमेचे पूजा करून जिवंत सापांचे रक्षण करेल अशी शपथ घ्या.

2) नागपंचमीच्या दिवशी स्वयंपाक करण्यासाठी तवा आणि लोखंडी कढईत चुलीवर किंवा गॅसवर ठेवू नका कारण असे केल्याने सर्पदेवतेला त्रास होतो, असे मानले जाते.

3) नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाला किंवा नागदेवाला तांब्याच्या भांड्यात दूध अर्पण करू नये. पाण्यासाठी तांब्याचे भांडे आणि दुधासाठी पितळाचे भांडे वापरावे.

4) सुई, चाकू, करवत यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी अशूभ मानला जातो.

5) या दिवशी जिवंत सापाला दूध देऊ नका. दूध हे सापांसाठी विषासारखे असू शकते, म्हणून त्यांच्या मूर्तीवरच दूध अर्पण करावे. कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे उत्खनन करण्यास मनाई आहे. म्हणजे जमीन खुपरणी करणे, शेतातील गवत उपटणे या गोष्टी करणे टाळाव्यात. असं म्हणतात की ,असे केल्याने जमिनीच्या आतील सापांच्या बिळाला धक्का लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT