Jowari lahya  esakal
संस्कृती

Nag Panchami 2022: ज्वारीच्या लाह्या घरच्या घरी कशा तयार करायच्या ?

नागदेवतेेला प्रसाद म्हणून वाहल्या जाणाऱ्या लाह्या घरच्या घरी कशा तयार करायच्या हे आज आपण पाहणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Nag Panchami 2022: नागपंचमीच्या दिवशी तांदूळ, माती, शेणाच्या सहाय्याने नागदेवताची प्रतिमा काढल्या जाते. तर काही ठिकाणी रांगोळीच्या चुण्यांच्या सहाय्याने देखील नागदेवताची प्रतिमा तयार करतात आणि त्याचे मनोभावे पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्र नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. नागाला प्रसाद म्हणून वाहल्या जाणाऱ्या लाह्या घरच्या घरी कशा तयार करायच्या हे आज आपण पाहणार आहोत.

लाह्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

• एक कप ज्वारी

• एक कप पाणी

कृती :

• सर्वप्रथम पाणी चांगले गरम करावे.पाणी गरम झालं की मग त्या पाण्यात ज्वारी 15 मिनिटे भिजवत ठेवावी.

• 15 मिनिटानंतर भिजत घातलेल्या ज्वारी पाणीतुन उपसून घ्यावी आणि नंतर मग कॉटनच्या कपड्यावर छान पसरुन ठेवावी. किंवा तुम्ही सुती कॉटनच्या कपड्यात ती ज्वारी बांधून देखील ठेवू शकता या पद्धतीला ज्वारीचे उमले करणे असे देखील म्हणतात.उमले तयार झाले की , आता लोखंडाची कढई गॅसवर गरम करायल ठेवा.

• जेव्हा कढई चांगली गरम होईल तेव्हा त्यात भिजवून वाळवलेली ज्वारी टाका.

• ती ज्वारी कढईत टाकल्यानंतरसूती कपड्याच्या साहाय्याने ती निट हलवत रहा.

• पुढच्या काही मिनिटांत तुमच्या ज्वारीच्या लाह्या /ज्वारीचे पॉपकॉर्न तयार होतील.

पुर्वीच्या काळात नागपंचमीला भरपूर ज्वारी च्या लाह्या केल्या जायच्या.नंतर त्या तयार लाह्या जात्यावर दळून त्याचे पिठ तयार केले जायचे. नंतर त्या पिठात तुप गुळ घालुन त्याचे मस्त लाडू तयार करत होते.लाह्या या पावसाळ्यात खायला पौष्टिक असतात.

टिप :

• ज्वारी पुर्ण नीट वाळवलीतरच जास्त लाह्या तयार होतील

• ज्वारी 4 ते 5 तास वाळवून जर लगेच लाह्या करायला घेतल्यातर 50% पेक्षा कमी ज्वारीच्या लाह्या तायार होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT