Nag Panchami 2024  esakal
संस्कृती

Nag Panchami 2024 : नागपंचमीच्या दिवशी 'या' गोष्टी नक्की करा, महादेव होतील प्रसन्न अन् घरात होईल भरभराट..!

Nag Panchami 2024 : दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Nag Panchami 2024 : श्रावण महिन्यातील ५ व्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो. आज या नागपंचमीच्या सणाचा संपूर्ण देशात उत्साह पाहायला मिळत आहे. श्रावणातील या पहिल्या मोठ्या सणाची लगबग सगळीकडे पाहायला मिळते. आजच्या या खास दिवशी नागदेवतेची आणि भगवान शंकरांची खास पूजा केली जाते.

दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. आजच्या दिवशी नागदेवतेची खास पूजा केली जाते. ही पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची विशेष कृपा राहते, असे मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करण्यासोबतच नागदेवतेची पूजा करण्याची फार जुनी परंपरा आहे. ही परंपरा आजही पाळली जाते.

नागपंचमीच्या दिवशी ज्योतिष शास्त्रात काही अतिशय सोपे आणि विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. आजच्या दिवशी या गोष्टी केल्याने व्यक्तीला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

नागपंचमीच्या दिवशी करा 'या' गोष्टी

दुधाचा अभिषेक

नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराला दुधाचा अभिषेक करण्यासोबतच नागदेवतेला ही दूध अर्पण करावे. आजच्या दिवशी सूर्यास्त झाल्यावर लगेच गाईचे दूध नागदेवतेच्या नावाने मंदिरात आणि घरातील देवघराजवळ ठेवावे. जर आज तुम्ही हा दुधाचा उपाय केला तर, तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच, जीवनातील दु:खांपासून मुक्ती मिळेल, अशी देखील धार्मिक मान्यता आहे.

धनलाभ

आजच्या दिवशी चांदीच्या धातूपासून बनवलेल्या नाग-नागिणीची जोडी मंदिरात दान करणे खूप शुभ मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते, असे मानले जाते.

पितृदोषांपासून मुक्ती

नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराला चंदन अर्पित करणे, अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे, आजच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर चंदन अर्पित करा आणि त्यानंतर, स्वत:ला चंदनाचा टिळा लावा. त्यानतंर, श्रीमद भगवद पुराणाचे वाचन करावे. या सर्व गोष्टी केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.

पूजा-पाठ

शिवाय, आजच्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी घरात कापूर लावा. तसेच, नागदेवतेची आणि शंकराची पूजा केल्यानंतर श्रीमद भगवद पुराण आणि श्री हरिवंश पुराणचे पठण करा. नागपंचमीला हा उपाय केल्याने तुमच्यावर देवाची नेहमीच कृपा राहते आणि घरात सुख-समृद्धी नांदेल, असे मानले जाते.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ स्विर्झलंडमध्ये; ९० दिवसांचा मिळवला व्हिसा

lioness guard VIDEO : नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरासमोर चक्क सिंहिणीचा पहारा!

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

Career Horoscope 30th Sept: उद्या गजकेसरी राजयोग! मान-सन्मान आणि यशाची दारे उघडणार; 'या' राशींचे करिअर झेपावणार

SCROLL FOR NEXT