Navratrotsav
Navratrotsav Sakal
संस्कृती

।। श्रीनवरात्रवासिनीची आरती ।।

सकाळ वृत्तसेवा

आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसलिं सिंहासनी हो।

प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करूनी हो।

मूलमंत्रजप करूनि भोवते रक्षक ठेवूनी हो।

ब्रह्माविष्णू रुद्रआईचे पूजन करिती हो ॥1॥

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो।

उदोकारें गर्जती काय महिमा वर्ण तिचा हो ॥धृ.॥

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो।

सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।

कस्तूरीमळवट भांगी शेंदूर भरूनी हो।

उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ॥2॥

तृतीयेचे दिवशीं अंबे शृंगार मांडिला हो।

मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो।

कंठींची पदकें कांसे पीतांबर पिवळा हो।

अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥3॥

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो।

उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो।

पूर्णकृतं पाहसी जगन्माते मनमोहिनी हो।

भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणीं हो ॥4॥

पंचमीचे दिवशीं व्रत ते उपांगललिता हो।

अर्घ्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तवितां हो।

रात्रीचें समयीं करिती जागरण हरिकथा हो।

आनंदे प्रेम तें आलें सद्भावें क्रीडतां हो ॥5॥

पष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो।

घेऊनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो।

कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफळा हो।

जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळां हो ॥6॥

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो।

तेथें तूं नांदसी भोंवति पुष्पें नानापरी हो।

जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो।

भक्त संकटी पडतां झेलुनी घेसी वरचे वरी हो ॥7॥

अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो।

सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो।

मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो।

स्तनपान देउनि सुखी केलें अंतःकरणीं हो ॥8॥

नवमीचे दिवशीं नवदिवसांचे पारणे हो।

सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करूनी हो।

षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो।

आचार्य-ब्राह्मणां तृप्त केलें कृपेंकरूनी हो ॥9॥

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो।

सिंहारूढ दारूण शस्त्रे अंबे त्वां घेऊनी हो।

शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो।

विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो ॥10॥

देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं

वारी वारी जन्ममरणांते वारी

हारी पडलो आतां संकट निवारी ।।१।।

जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।।धृ।।

त्रिभुवन भुवनी पाहतां तुजऐसी नाहीं

चारही श्रमले परंतु न बोलवे काही

साही विवाद करितां पडिलें प्रवाहीं

ते तू भक्तांलागीं पावसि लवलाहीं

।। जय देवी।। २।।

प्रसन्न वदनें प्रसन्न होसी निजदासां

क्‍लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा

अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा

नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी

सुरवरईश्वरवरदे तारक संजिवनी

।। जय देवी।। ३।।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT