Ekvira devi esakal
संस्कृती

खानदेशची कुलस्वामिनी एकवीरादेवी!

निखील सुर्यवंशी


धुळे : खानदेशची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ म्हणून धुळे शहरातील श्री एकवीरादेवी मंदिराची ओळख आहे. देवपूरमध्ये पांझरा नदीकिनारी असलेले एकवीरा देवी आणि रेणुकामाता मंदिर पूर्वापार गुरव घराण्याच्या वहिवाटीत होते. सुमारे चारशे वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला. मंदिर हेमाडपंथी व प्राचीन असून, पूर्वाभिमुखी आहे. एकवीरा व रेणुकामाता आदिशक्ती श्री पार्वतीची रूपे मानली जातात. त्यांनी वेगवेगळे अवतार घेत असुरीशक्तीचा नाश केला. रेणुकामातेचा पुत्र परशुराम यांच्या नावावरून भगवती एकवीरादेवी म्हटले जाते.

मंदिराच्या दर्शनी भागावर दीपस्तंभ आहे. मूर्ती स्वयंभू, अष्टभुजा, शेंदूरलेपन असून, पद्मासनी आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला गणपती, तर डाव्या बाजूला तुकाईमातेची चतुर्भुज शेंदूरलेपनाची मूर्ती आहे. मंदिर पूर्व-पश्‍चिम 132 फूट, दक्षिणोत्तर 115 फूट, उंची 15 फूट असून, शिखराची उंची 27 फूट आहे. मंदिरात प्रवेशासाठी दगडी दरवाजा आहे. त्यावर नगारखाना आहे. परिसरात शितलामाता, खोकलीमाता, परशुराम, हनुमान, विठ्ठल-रुक्‍मिणी, महादेवाचे मंदिर आहे. पश्‍चिमेस महालक्ष्मीचे मंदिर आहे. त्या काळी मंदिरात येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून परिसरात खोदलेली पायविहीर आजही आहे. 1955 मध्ये ट्रस्टची स्थापना झाली. भाविकांच्या सहकार्याने 1967 व 1987 मध्ये टप्पाटप्प्याने मंदिराचा जीर्णोद्धार झाला. ट्रस्टतर्फे 1988 मध्ये मंदिराचे सुशोभीकरण झाले.
संकट दूर करीत मनोकामना पूर्ण करणारी आणि नवसाला पावणारी देवी, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम होतात. चैत्रात यात्रा भरते, तेव्हा अनेक भाविक नवसपूर्ती, कुळधर्म, जावळ काढण्यासाठी येतात. यात्रेपूर्वी देवीची पालखी काढण्याची जुनी परंपरा आहे. दर पौर्णिमेला मंदिराच्या आवारात पालखी निघते. मंदिरात गुढीपाडवा, अक्षयतृतीया, आषाढी एकादशी, श्रावणमास, गणेश चतुर्थी, शारदीय नवरात्रोत्सव, ललितापंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, कोजागरी पौर्णिमा, कार्तिक स्नान, नरक चतुर्दशी, कार्तिकी एकादशी, अष्टमी, त्रिपुरारी पौर्णिमा, मकरसंक्रांत, महाशिवरात्र, शितलामाता उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होतात. दिनविशेष लक्षात घेऊन अभिषेक, सप्तशती पाठ, रुद्राभिषेक आदी कार्यक्रम होतात. मंदिरात शाश्‍वत अभिषेकाची योजना सुरू आहे. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आदी भागातून भाविक येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT