Navratri 2023 esakal
संस्कृती

Navratri 2023 : नवरात्रीला घटस्थापनेचा योग्य मुहूर्त काय, कोणत्या दिवशी कुठला रंग असणार? इथे वाचा

शास्त्रानुसार या दिवशी आपापल्या कुळाचाराप्रमाणे घटस्थापना करावी.

सकाळ ऑनलाईन टीम

Navratri 2023 : आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. आज घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ०८ ते १२.३० असा आहे असे ज्योतिष्य विश्वगुरू डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.

शास्त्रानुसार या दिवशी आपापल्या कुळाचाराप्रमाणे घटस्थापना करावी. नवरात्र काळात १७ ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल. तर १८ ऑक्टोबरला विनायक चतुर्थी असून बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे. १९ ऑक्टोबरला ललिता पंचमी असून उपांग ललिता पूजन करावे. २० ऑक्टोबरला सरस्वती आवाहन करून २१ ऑक्टोबरला सरस्वती व महालक्ष्मी पूजन करावे. २२ ऑक्टोबरला महाअष्टमीचा उपवास करावा.

२३ ऑक्टोबरला नवमी उपवास करून नवरात्र उत्सवाची समाप्ती केली जाईल. या दिवशीच हेमंत ऋतूचा प्रारंभ होत आहे. हा नवरात्रीमधला अतिशय शुभ दिवस असतो.

शास्त्रानुसार ज्या देवतेचे नवरात्र असेल त्यांची पूजा करताना फुलांनी पाणी शिंपडून स्नान इत्यादी उपचार करावेत. इतर देवतांना नेहमीप्रमाणे ताम्हणात अभिषेक करावा आणि त्यांची स्वतंत्रपणे पूजा करावी. काही ठिकाणी गैरसमजामुळे घट बसविल्यानंतर इतर देवांची पूजा करीत नाहीत. हे शास्त्रानुसार योग्य नाही, असे डॉ. वैद्य म्हणाले.

प्रकृतीच्या किंवा वयोमानामुळे नवरात्राचे उपवास रोज करणे शक्य नसेल तर दोन दिवस उपवास करावा. अथवा फक्त अष्टमीचा उपवास करावा. हे नसेल जमत तर नऊ दिवस रोज भाजके खावे.

अशौचामुळे नवरात्रातील काही दिवस पूजेसाठी मिळत असतील तर अशावेळेस सात दिवस, पाच दिवस, तीन दिवस एक दिवसाचे सुद्धा नवरात्र करता येते.

ज्योतिषशास्त्रानुसार १५ रोजी केशरी रंग,१६ रोजी पांढरा,१७ रोजी लाल ,१८ रोजी निळा, १९ रोजी पिवळा,२० रोजी हिरवा ,२१ रोजी ग्रे, २२ रोजी गुलाबी २३ ऑक्टोबरला जांभळा रंग वापरावा, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT