Navratri 2023 esakal
संस्कृती

Navratri 2023: नवरात्रौत्सवात गृहप्रवेश करणे मानले जाते शुभ; जाणून घ्या ‘या’ गोष्टी

नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये अनेक कामांची सुरूवात केली जाते.

सकाळ डिजिटल टीम

अवघ्या काही दिवसांवर शारदीय नवरात्रौत्सव येऊन ठेपला आहे.१५ ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होणार आहे. देशात १५ ते २४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रौस्तव साजरा केला जाणार आहे. २४ ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आहे.

शारदीय नवरात्रौत्सवाचा हा सण आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र घटस्थापना केली जाते. अनेक ठिकाणी दुर्गा मातेची मूर्ती स्थापन करून हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

हिंदू धर्मातील शास्त्रांनुसार नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये अनेक कामांची सुरूवात केली जाते. अनेक धार्मिक, कौटुंबिक कार्यांची सुरूवात या दिवसांमध्ये करणे हे शुभ मानले जाते. विशेष म्हणजे या काळात कोणतेही शुभ मुहूर्त न पाहता तुम्ही शुभ कार्य करू शकता. नवरात्रीच्या शुभ पर्वात अनेक जण गृहप्रवेश ही करतात. या काळात गृहप्रवेश केल्याने घरात सूख-शांती आणि समृद्धी देखील येते.

नवरात्रीच्या काळात जर तुम्ही सुद्धा तुमच्या नव्या घरात गृहप्रवेश करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या आहेत या गोष्टी चला तर मग जाणून घेऊयात.

पती-पत्नीने एकत्र करावा गृहप्रवेश

नवीन घरात प्रवेश करताना पती-पत्नीने एकत्र गृहप्रवेश करायला हवा. जर तुमचे नुकतेच लग्न झाले असेल किंवा तुम्ही नवविवाहित असाल तर नवीन घरात प्रवेश करताना पतीने उजवा पाय पुढे ठेवावा आणि पत्नीने डावा पाय पुढे ठेवावा.

तोरण अवश्य लावा

नवरात्रीच्या दिवसांमध्ये नव्या घरात गृहप्रवेश करताना तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला अशोक किंवा आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांनी सजलेले तोरण लावावे. यासोबतच दारात लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावायला विसरू नका. तसेच, सुंदर रांगोळी देखील काढा. या सर्व गोष्टी केल्याने घरात समृद्धी नांदते असे मानले जाते.

कलश

गृहप्रवेश करताना कलशाला विशेष महत्व आहे. गृहप्रवेशाच्या वेळी गणेशाचे ध्यान अवश्य करा आणि गणपतीची ध्यानधारणा करत घराच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात मंगल कलशाची स्थापना करा. तसेच, नवीन घरातील देवघरात गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती, शंख आणि श्रीयंत्र याची स्थापना करा. त्याची नित्यनेमाने पूजा करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT