Navratri 2023 esakal
संस्कृती

Navratri 2023 : शारदीय नवरात्रौत्सवात देवीच्या व्रताचे महत्व काय ? ९ दिवसच का साजरा केला जातो हा उत्सव ?

नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या ९ रूपांची भक्तीभावाने पूजा केली जाते.

सकाळ डिजिटल टीम

Navratri 2023 : शारदीय नवरात्रौत्सवला अवघे काही दिवस उरले आहेत. सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धामधूम पहायला मिळत आहे. १५ ऑक्टोबरपासून नरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. हा नवरात्रौत्सव २४ ऑक्टोबरला समाप्त होणार आहे. २४ ऑक्टोबरला विजयादशमीचा सण आहे.

नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात ९ दिवस देवीच्या ९ रूपांची भक्तीभावाने पूजा केली जाते. अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या शारदीय नवरात्रौत्सवात देवीचे व्रत केले जाते. अनेक जण या ९ दिवसांमध्ये उपवास देखील करतात.

परंतु, या शारदीय नवरात्रौत्सवात देवीच्या व्रताचे महत्व काय ? आणि हा नवरात्रौत्सव ९ दिवसच का साजरा केला जातो ? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

शारदीय नवरात्रौत्सवातील देवीच्या व्रताचे महत्व काय ?

नवरात्रौत्सवात देवीच्या व्रताला अतिशय महत्व आहे. या ९ दिवसांमध्ये देवीचे व्रत केल्याने घरात सूख-शांती आणि समृद्धी नांदते असे मानले जाते. हे व्रत सुरू करण्यापूर्वी घरातील स्वच्छता आवर्जून केली जाते.

या ९ दिवसांमध्ये देवीची पूजा, अर्चना केली जाते. उपवास केले जातात. देवीला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. देवीच्या ग्रंथांचे पारायण केले जाते. ‘नवरात्री’ तील नव या शब्दाचा अर्थ नऊ असा होतो आणि नवीन असा ही होतो.

नवरात्रौत्सवाला सुरूवात झाल्यावर कडाक्याची थंडी पडू लागते. ऋतू बदलू लागतात आणि थंडीला खऱ्या अर्थाने सुरूवात होते. नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये जास्त थंडी पडू लागते, त्यामुळे या ९ दिवसांमध्ये उपवास करणारे संतुलित आणि सात्विक आहार घेतात. देवीची प्रार्थना पूजा, ध्यान आणि चिंतन यावर लक्ष केंद्रित करून स्वत:ला आतून शक्तिशाली बनवले जाते.

नवरात्रौत्सव हा ९ दिवसांमध्येच का साजरा केला जातो ?

या रविवारी (१५ ऑक्टोबरपासून) शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे, सर्वत्र देवीच्या उत्सवाची धामधूम पहायला मिळत आहे. या नवरात्रौत्सवाची सुरूवात ही पहिल्या दिवशी घटस्थापना करून केली जाते, आणि शेवटच्या दिवशी विजयादशमीचा(दसरा) सण उत्साहात साजरा करून या नवरात्रौत्सवाची समाप्ती केली जाते.

या विजयादशमीच्या दिवशी भगवान श्रीरामाने लंकापती रावणाचा पराभव केला आणि याच दिवशी देवी दुर्गामाताने महिषासूर या असूरासोबत ९ दिवस युद्ध केले आणि नंतर नवमीच्या रात्री त्याचा वध केला.

पुराणातील एका कथेनुसार देवी दुर्गा मातेने महिषासूर या राक्षसासोबत तब्बल ९ दिवस युद्ध केले. त्यानंतर नवमीच्या रात्री देवीने महिषासूर या असूराचा वध केला. त्या दिवसापासूनच देवी दुर्गा मातेला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणून ओळखले जाते.

खरं तर तेव्हापासून माता दुर्गेच्या शक्तीला हा नवरात्रौत्सव समर्पित केला आहे. या ९ दिवसांमध्ये देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते. या ९ दिवसांमध्ये देवीचे व्रत केले जाते आणि उपवास केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Maharashtra politics: मूळ मुख्यमंत्री अमित शहा! देवेंद्र फडणवीस शॅडो CM, शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सवाल

Shraddha Bhosale : कुटुंब मूळचे गुजरातचे, जन्म मुंबईत, शिक्षण अमेरिकेत अन् सासर कोकणात; कोण आहेत श्रद्धा सावंत भोसले? भाजपनं दिलीय उमेदवारी

‘कसाब बिर्याणी मागतोय’ हा ‘माझाच फंडा’! खासदार ॲड. उज्ज्वल निकम; प्रकट मुलाखतीत उलगडले अनेक किस्से..

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

SCROLL FOR NEXT