Navratri 2023 esakal
संस्कृती

Navratri 2023 : नवरात्रीत उपवास करत असाल तर घ्या ही काळजी, शास्त्र असतं ते..

धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात उपवास केल्यास किंवा विधीवत देवीच्या ९ रूपांची पूजा केल्यास व्यक्तीस समृद्धी आणि वैभव प्राप्त होते.

साक्षी राऊत

Navratri 2023 : सनातन धर्मात नवरात्रीचे विशेष महत्व आहे. पंचांगानुसार वर्षातून चार वेळा नवरात्रीचे उपवास केले जातात. जसे की चैत्र नवरात्री, दोन गुप्त नवरात्री आणि एक शारदीय नवरात्री. यंदा १५ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात उपवास केल्यास किंवा विधीवत देवीच्या ९ रूपांची पूजा केल्यास व्यक्तीस समृद्धी आणि वैभव प्राप्त होते.

तुम्हीही नवरात्रीत उपवास करणार असाल तर या काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर नवरात्रीत कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी ते जाणून घेऊया. अयोध्येचे ज्योतिष पंडित कल्की यांच्या मते, माता जगदंबेच्या ९ स्वरूपांची विधीवत पूजा केल्यास त्याचं फळ तुम्हाला मिळतं. शिवाय मातेला प्रसन्न करण्यासाठी काही उपायही केले जातात. या काळात उपवास करताना विशेष काळजी घेतली जाते. जेणेकरून उपवासात आणि पूजेत खंडण पडू नये.

कलश स्थापना

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेच्या वेळी संकल्प घ्यावा. नवरात्रीत कलश स्थापना प्रतिपदा तिथीच्या दिवशी केली जाते.

अखंड ज्योत

धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल तर प्रतिपदा तिथी ते नवरात्री दशमी तिथीपर्यंत अखंड ज्योत लावून दूर्गा माता प्रसन्न होते. असे केल्यास भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे.

रोज करावी आरती

नवरात्रीच्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी देवीची आरती करावी आणि तिच्या प्रिय वस्तूंचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने देवी माता प्रसन्न होते अशी मान्यता आहे.

नवरात्रीत या गोष्टी आवर्जून अर्पण कराव्यात

नवरात्रीच्या ९ दिवसांच्या उपवासात वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा करण्यास विशेष महत्व आहे. वेगवेगळ्या दिवशी देवी जगदंबेला लाल वस्त्र अर्पण करावे. श्रृंगाराचे सामान अर्पण करावे. लाल फूल अर्पण करावे. असे केल्याने दूर्गा मातेची विशेष कृपा प्राप्त होते.

या गोष्टींची घ्या विशेष काळजी

नवरात्रीच्या दिवसांत काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. नवरात्रीत तुमच्या घराची स्वच्छता आवर्जून करावी. नवरात्रीच्या दिवसांत मनोभावे मातेची पूजा-अर्चना करण्यास विशेष महत्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT