Navratri 2023  esakal
संस्कृती

Navratri 2023 : नवरात्रौत्सवात ‘या’ वस्तूंची खरेदी करणे मानले जाते शुभ

नवरात्रौत्सवाच्या काळात काही वस्तूंची खरेदी करणे हे अतिशय शुभ मानले जाते.

सकाळ डिजिटल टीम

Navratri 2023 : यंदाचा शारदीय नवरात्रौत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १५ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात होणार आहे. १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान देशात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये देवीच्या ९ रूपांची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर घरोघरी घटस्थापना केली जाते. नवरात्रौत्सवाच्या काळात काही वस्तूंची खरेदी करणे हे अतिशय शुभ मानले जाते.

या ९ दिवसांच्या काळात या गोष्टींची खरेदी केल्याने घरात सूख शांती आणि समृद्धी नांदते असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या वस्तू ?

नवरात्रौत्सवात करा या वस्तूंची खरेदी

देवीची मूर्ती

नवरात्रौत्सवाचा हा सण आदिशक्तीला समर्पित आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात देवीची मूर्ती खरेदी करणे हे अतिशय शुभ मानले जाते. ही मूर्ती घरी आणून तिची विधीवत पूजा केल्याने देवीची कृपा आपल्यावर राहते.

चांदीची वस्तू

नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये चांदीच्या वस्तूंना अतिशय महत्व आहे. या काळात चांदीची कोणतीही वस्तू खरेदी केल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते, असे मानले जाते.

कलश

नवरात्रौत्सवात कलशाला अतिशय महत्व आहे. नवरात्रीची सुरूवात ही कलशाच्या स्थापनेने होते. कलशाला शुभ मानले जाते त्यामुळे, या नवरात्रौत्सवात कलश जरूर खरेदी करा. चांदी, पितळ, सोनं किंवा मातीचा कलश तुम्ही खरेदी करू शकता.

देवीच्या पाऊलांचे ठसे

नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये देवीच्या पाऊलांचे ठसे विकत घेऊन घरी आणा. या पावलांची घरी विधिवत पूजा करा. देवीच्या पाऊलांचे हे ठसे अतिशय शुभ मानले जातात. त्यांचे पूजन केल्याने घरात सूख-शांती नांदते.

देवीच्या पाऊलांचे हे ठसे तुम्ही देवघराजवळ ठेवून त्यांची पूजा करू शकता. ते जमिनीवर किंवा फरशीवर ठेवल्याने त्या पावलांवर आपले पाय पडू शकतात, त्यामुळे देवीच्या पावलांचे ठसे हे देवघराजवळ ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT