Navratri Festival Kolhapur Jyotiba Temple Jagar Ceremony esakal
संस्कृती

Jyotiba Dongar : दख्खनचा राजा जोतिबा देवाचा आज जागर; सोहळ्याला दीड लाखांवर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता

आज जागर सोहळा असल्याने दीड लाखाच्या पुढे भाविक येण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची पाच पाकळी सोहन कमळपुष्पातील राजेशाही थाटातील खडी महापूजा बांधण्यात आली.

जोतिबा डोंगर : येथील श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिरात (Jyotirlinga Temple) शनिवारी (ता. २१) जोतिबा देवाचा जागर सोहळा होणार असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज जागर सोहळा असल्याने दीड लाखाच्या पुढे भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिरात (Jyotiba Dongar Kolhapur) दर्शन रांगा व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी सांगितले.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या आज सहाव्या दिवशी दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची पाच पाकळी सोहन कमळपुष्पातील राजेशाही थाटातील खडी महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा गावातील दहा गावकर व पुजारी यांनी बांधली.

आजही मंदिरात भव्य दिव्य असा धुपारती सोहळा पार पडला. या वेळी हजारो भाविक उपस्थित होते. ‘चांगभलं’च्या जयघोषाने डोंगर दुमदुमला. दुपारी बारा वाजता मंदिरात तोफेची सलामी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT