Navratri Utsav sakal
संस्कृती

Navratri Utsav : चला करूया महालक्ष्मीचा जागर

शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून (ता. १५) सुरुवात होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून (ता. १५) सुरुवात होत आहे. यात महालक्ष्मीची आराधना करण्यासाठी सामुदायिक श्रीसूक्त पठणाचे आयोजन केले आहे. सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरासमोर उत्सवाच्या दुसऱ्या माळेला म्हणजे सोमवारी (ता. १६) हा उपक्रम होईल. महालक्ष्मी मंदिराने हा उपक्रम आयोजित केला आहे.

‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘विश्वकर्मा विद्यापीठा’चे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे. सकाळी सहा वाजता महालक्ष्मी मंदिरासमोर प्रसन्न वातावरणात श्रीसूक्ताचे महिला सामुदायिकरीत्या पठण करतील. ध्यानधारणेने कार्यक्रमाला प्रारंभ होईल. त्यानंतर ॐकार, शंखनाद आणि श्रीगणेश अथर्वशीर्षाचे पठण केले जाईल. त्यानंतर सामुदायिक श्रीसूक्त पठणाला सुरुवात होईल. फलश्रुती आणि आरतीने सांगता होईल.

शंखनाद, मंत्रोच्चार आणि सूक्तपठणातून निर्माण होणाऱ्या चैतन्यदायी वातावरणाचे साक्षीदार होण्याची आणि त्यात सहभागी होण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. नवरात्रोत्सवात घरोघरी देवीची आराधना आणि उपासना केली जाते. या आराधनेतील महत्त्वाचा भाग म्हणजे श्रीसूक्त. हे वैदिक सूक्त असून ते महालक्ष्मीची आराधना करणारे सूक्त आहे. ऋग्वेदातील खिलसूक्तात ते दिलेले आहे. लक्ष्मीचे वर्णन या सूक्तात केले आहे.

या कार्यक्रमाला आगामी ‘श्यामची आई’ या चित्रपटातील अभिनेत्री गौरी देशपांडे उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT