Neem Karoli Baba
Neem Karoli Baba esakal
संस्कृती

Neem Karoli Baba : नीम करोली बाबांचा 108 नंबरशी आहे जवळचा संबंध, जाणून व्हाल थक्क

धनश्री भावसार-बगाडे

Neem Karoli Baba : उत्तर प्रदेशातल्या फिरोजाबाद जिल्ह्यातील अकबरपुर गावात जन्मलेल्या नीम करोली बाबांना या युगातले महान संत समजले जाते. त्यांचे भक्त त्यांना हनुमानाचा अवतारही मानतात. त्यांचे भक्त फक्त देशातच नाही तर जगभरात आहेत.

वयाच्या १७ व्या वर्षी हनुमंताचे दर्शन

नीम करोली बाबांच्या वडिलांचं नाव दुर्गा प्रसाद शर्मा होतं. तर बाबांचं खरं नाव लक्ष्मी नारायण शर्मा होतं. असं सांगितलं जातं की, त्यांना वयाच्या १७ व्या वर्षी हनुमंताचे दर्शन झाले. त्यानंतर ते धर्म आणि अध्यात्माच्या मार्गाला लागले. यात त्यांना अनेक चमत्कारीक सिद्धीसुद्धा मिळाल्या. त्यांनी हनुमंतालाच आपले गुरू आणि आराध्य मानले. म्हणूनच त्यांचे अनुयायी त्यांना कलियुगातला हनुमंताचा अवतार मानतात.

१०८ नंबरशी जवळचं नातं

बाबांचा १०८ नंबरशी जवळचं नातं आहे. बाबांनी आपल्या जीवन काळात १०८ हनुमान मंदिरांचे निर्माण केले आहे. सगळ्यात पहिले हनुमान गढी इथे मंदिर स्थापन करण्यात आलं. नंतर नैनितालमध्ये बाबा नीम करोली हनुमान मंदिर स्थापन करण्यात आले. त्यानंतर भूमियाधार इथे रस्त्याला लागून एका मंदिराची स्थापना झाली.

त्यानंतर बाबा कैंची धाम गेले. तिथे हजारोंच्या संख्येने भक्त बाबांच्या दर्शनासाठी जातात. अशा प्रकारे बाबंनी आपल्या जीवन काळात १०८ हनुमान मंदिरांची स्थापना केली आहे. याशिवाय बाबांचे जगभरात एकूण १०८ आश्रम आहेत. या सर्व आश्रमांमध्ये नैनितालचे कैंचीधाम आश्रम आणि अमेरिकेत न्यू मॅक्सिको सिटीमधला टाउस आश्रम हे सर्वात मोठे आश्रम आहेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT