New Year 2023 esakal
संस्कृती

New Year 2023: यंदा 13 महिन्यांचं असणार हिंदू कॅलेंडर! तब्बल 19 वर्षांनी जुळून आला दुर्मिळ योग

या वर्षात महादेवाचा श्रावण महिना एक नाही तर दोन महिने असणार आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Adhik Maas 2023: नवं वर्ष सुरू होण्यास अगदी काहीच दिवस उरलेत. ज्योतिष्यांच्या मते, 2023 हे वर्ष फार खास असणार आहे. हिंदू पंचांगानुसार, येणारं नवं वर्ष 12 नाही तर 13 वर्षांचं असणार आहे. या वर्षात महादेवाचा श्रावण महिना एक नाही तर दोन महिने असणार आहे.

अधिक मासामुळे हे घडणार असून याला मलमास असेही म्हणतात. ज्योतिष्यांच्या मते, अधिकमासामुळे तब्बल 19 वर्षानंतर श्रावण दोन महिने असणार आहे.

कधीपासून कधी पर्यंत असेल अधिक मास?

2023 मध्ये अधिकमास 18 जुलैपासून सुरू होईल तर 16 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल. या महिन्याला भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना म्हटलं जातं. हा महिना श्रावण महिन्यातच सुरू होणार असल्याने महादेवाची भक्ती करणाऱ्यांना अधिक वेळ मिळणार आहे.

काय असते मलमास?

हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना जुळून येतो ज्याला अधिकमास किंवा मलमास किंवा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. सूर्य वर्ष 65 दिवस आणि 6 तास असते. तर चंद्र वर्ष 354 दिवसांचं मानल्या जातं. दोन्ही वर्षांमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक आहे. प्रत्येक वर्षी कमी होणाऱ्या या 11 दिवसांना जोडल्यास एक महिना होतो. याच अंतराला सुरळीत करण्यासाठी दर तीन वर्षांनी चंद्र मास अस्तित्वात येते. ज्याला अधिकमास असं म्हणतात.

अधिकमासात चुकूनही करू नका या चुका

लग्न - अधिक मासात लग्न करणं अशुभ मानल्या जातं. या काळात लग्न केल्यास ना तुम्हाला भौतिक सुख मिळणार ना तुम्हाला शारीरिक सुख मिळणार. पती पत्नीत भांडणं होतील.

नव्या दुकानाचं काम - अधिकमासात नवा व्यवसाय सुरू करू नका. मलमासात नवा व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला अनेक आर्थिक अडचणी येतील.

इमारतीचे बांधकाम - अधिकमासात नव्या इमारतीचं बांधकाम करू नये. या काळात बनवलेल्या घरांत सुख शांतीचा भंग होतो.

शुभ कार्य करू नये - कुठलेही मंगल कार्य जसे की कर्णवेध, मुंडन अशुभ मानल्या जातं. या काळात इमारतीचे किंवा कुठलेही काम केल्यास नात्यातला गोडवा कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT