pandit upadhye and shalini vatave
pandit upadhye and shalini vatave sakal
संस्कृती

Guru Pornima : व्हायोलिनवादक गुरु-शिष्यांचं अद्‌भुत नातं

नीला शर्मा

पुण्यातील शालिनी वाटवे यांचं वय सध्या ९०, तर त्यांचे गुरू प्रसिद्ध व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचं वय ६५ आहे.

पुण्यातील शालिनी वाटवे यांचं वय सध्या ९०, तर त्यांचे गुरू प्रसिद्ध व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचं वय ६५ आहे. शालिनीताई वयाच्या साठीत व्हायोलिन शिकू लागल्या. तेव्हापासून गेली ३० वर्षे या गुरु-शिष्यांचं नातं उत्तरोत्तर दृढ होत गेल्याचं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दोघांनी आवर्जून सांगितलं आहे.

शालिनीताई म्हणाल्या, ‘अतुलजींकडे मी व्हायोलिन शिकायला गेले तेव्हा मी साठीची आणि ते पस्तिशीचे होते. त्यांचे सर्व विद्यार्थी हे माझ्याहून पुष्कळ लहान असताना, माझ्यासारख्या वयस्कर विद्यार्थिनीला ते शिकवतील का, ही धाकधूक मनात होती. मला पाठीच्या कण्यातील मणक्यांचा त्रास असल्याने, व्हायोलिन वाजवताना तो वाढणार नाही, असं तंत्र हवं होतं. या गुरुजींकडे ते आहे, हे समजलं होतं. मला ते शिकवायला तयार झाले आणि तेव्हापासून मी आजतागायत सतत त्यांच्याकडून नवनवे पाठ अवगत करत गाणी बसवली आहेत. त्यांपैकी सहा गीतं मी वाजवताना त्यांनी ती ध्वनिमुद्रित करून त्यांची सीडी काढली.

माझ्या आप्तस्वकीयांना देण्यापुरत्या तिच्या प्रती काढून त्या वाटल्या. नुकताच १८ मे रोजी कुटुंबीयांनी साजऱ्या केलेल्या माझ्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मी वादन केलं होतं. या प्रसंगाला संस्मरणीय करणारी अनमोल भेट मला गुरूंकडून मिळाली. चित्रपट विषयक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक व चित्रपट दिग्दर्शक बापू वाटवे यांची मी पत्नी. त्यांनी २० वर्षं चालवलेल्या ‘कथालक्ष्मी’ मासिकाची मी संपादिका होते. बालपणापासूनची संगीताबद्दलची आवड संसार व मासिकाच्या कामात मागं पडली होती. जरा सवड मिळाल्यावर मी इंग्रजी साहित्यात बीए केलं. ५० वर्षांची असताना एमए केलं. पुढे व्हायोलिन शिकतानाही अधूनमधून माझी आजारपणं, गुडघ्यावर शस्त्रक्रिया वगैरे कारणांमुळे तात्पुरता खंड पडला तरी मी लवकरच शिकणं सुरू करायचे. गुरुजी एरवी मला आईसारखं मानतात, पण शिकवणी सुरू झाल्याबरोबर मी विद्यार्थिनी व ते गुरू असतात.’

उपाध्ये यांनी स्पष्ट केलं की, तेव्हा साठीच्या असूनही शालिनीताईंचा उत्साह दांडगा होता. त्यांना मी शिकवू लागल्यावर त्यांचे प्रामाणिक प्रयत्न, समर्पित वृत्ती, शिस्त यांसारख्या गोष्टी भारावून टाकणाऱ्या ठरल्या.

आमच्या संस्थेतर्फे आयोजित ‘स्वरझंकार’ या संगीत महोत्सवातही त्या कार्यकर्ती म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेत आल्या आहेत. गेल्या दोन- अडीच वर्षांत आमची शिकवणी ऑनलाइन चालते. यासाठीचं तंत्रज्ञानही त्यांनी चटकन आत्मसात केलं. वाजवताना त्यांना वहीतील नोटेशन बघायची गरज पडत नाही. शिकवताना एखादी जागा मी घेतली आणि पुढच्या शिकवणीच्या वेळी विसरलो तर त्या आठवण करून देतात. माझ्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यच त्या झाल्या आहेत. कसं शिकावं, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. राग शिवरंजनी व बिहाग वाजवण्यात त्या विशेष रमतात.

शिवाय हिंदी- मराठी चित्रपटगीतं वाजवण्यातही त्या उत्तम वाजवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT