Nirjala Ekadashi 2023  esakal
संस्कृती

Nirjala Ekadashi 2023 : निर्जला एकादशीला घरी आणा ही मूर्ती, नशिबाची दारं उघडतील

मोठ्या एकादशींपैकी निर्जला एकादशी ही महत्वाची समजली जाते.

धनश्री भावसार-बगाडे

Nirjala Ekadashi Upay : हिंदू धर्मशास्त्रात प्रत्येक तिथीचं आपलं असं एक वेगळं महत्व सांगितलं आहे. यावेळी निर्जला एकादशी ३१ मे रोजी आली आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याचं विशेष महत्व आहे. यादिवशी गायत्री जयंतीपण साजरी करण्यात येते.

या दिवसाला विशेष महत्व आहे कारण, यादिवशी विधी पूर्वक पूजा, व्रत केल्याने जीवनातले सर्व संकट दूर होतात, असे मानले जाते. असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे केल्याने घरात सुख-समृद्धी आणि आनंद येतो.

निर्जला एकादशीला घरी आणा ही मूर्ती

ज्योतिषशास्त्रानुसार घरात कामधेनु गायीच्या मूर्तीची स्थापना करावी. हे फार शुभ मानलं जातं. असे मानले जाते की, ही मूर्ती घरात स्थापन केल्यावर घरात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. ही मूर्ती आणून विधीपूर्वक त्याची देवघरात स्थापना करा. त्यानंतर याची नियमित उपासना करावी.

वास्तूशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात उत्तर दिशेला तोंड करून कामधेनु गायीची प्रतिमा लावल्याने शुभ फळ मिळते. असं म्हणतात की या कोपऱ्यात देवी-देवतांचा वास असतो. यामुळे घरात धन-धान्याचे आगमन होते.

  • याशिवाय ही मूर्ती घराच्या मुख्य दरवाजावर स्थापन करावी. यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात वास करते.

  • शिवाय जर तुम्ही आर्थिक त्रासातून जात असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार मूर्ती ऐवजी फोटो लावला तरी चालतो.

  • असं म्हणतात कामधेनु गायीमध्ये जगत जननी देवी दुर्गा, धनाची देवी लक्ष्मी आणि विद्येची देवी सरस्वती या तिघींचा वास असतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : बालेवाडीत ढगांची गर्दी; रिमझिम पावसाची सुरुवात

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT