Hartalika 2022 esakal
संस्कृती

Hartalika 2022: हरतालिकेला या ५ गोष्टींचे दान केल्याने होतो धनलाभ

गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे व्रत करण्यात येते. या दिवशी अविवाहित महिला चांगला पती मिळावा म्हणून तर विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.

सकाळ डिजिटल टीम

भाद्रपद शुध्द तृतियेला हरतालिकेचे व्रत केले जाते. या व्रताने पार्वतीला भगवान शंकराची पती म्हणून प्राप्ती झाली असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी अविवाहित मुलिंनी वांछीत पती मिळवण्यासाठी हे व्रत करावे तर विवाहित महिलांनी पतीच्या दीर्घयुष्यासाठी करावे असे मानले जाते. या व्रताला सर्वात पवित्र व प्रभावी व्रत मानले गेले आहे. त्यामुळे हे व्रत एकदा सुरू केले की, आयुष्यभर निभवावे असे संकेत आहेत. तसेच या दिवशी काही दानपुण्य केले तर धनलाभ होतो असे म्हणतात.

जाणून घेऊ कोणते दान करावे

कपडे

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. त्यामुळे अन्न व वस्त्राचे दान श्रेष्ठ समजले जाते. हरतालिकेला महिलांनी गरीब ब्राह्मण महिलेला कपडे दान करावे.

श्रृंगार

हरतालिका हे व्रत सौभाग्याचे व्रत असल्याने या दिवशी सौभाग्याच्या लेण्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे या दिवशी श्रृंगाराचे साहित्य दान करणे शुभ मानले जाते.

तांदूळ

तांदूळ हे सुबत्तेचे व लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे तांदळाचे दान करणे शुभ मानले जाते.

गहु

धन-धान्याने घर भरलेले असावे असे प्रतिकात्मक म्हणून गव्हाला शुभ मानले जाते. म्हणून आपल्या घरातला थोडा भाग ब्राह्मणाला दान करणे शुभ असते. असे केल्याने घरात धनाची आवक वाढते.

फळे

या दिवशी फळांचे दान करणे फार चांगल् समजले गेले आहे. याबरोबरच उडिद आणि हरभऱ्याच्या डाळीचे दान शुभ समजले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT