IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

Rajasthan Royals beat SRH in IPL 2026 Eliminator वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवत IPL २०२६ च्या Qualifier 2 मध्ये दमदार प्रवेश केला. Eliminator सामन्यात वैभवने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची स्फोटक खेळी केली.
Rajasthan Royals beat Sunrisers Hyderabad in  Eliminator

Rajasthan Royals beat Sunrisers Hyderabad in Eliminator

esakal

Updated on

Rajasthan Royals beat Sunrisers Hyderabad in Eliminator Marathi News: वैभव सूर्यवंशीने दिलेल्या मानसिक धक्क्यातून सनरायझर्स हैदराबादला सावरणे अवघड झाले. त्याने २९ चेंडूंत १२ षटकार व ५ चौकारांसह ९७ धावांची विक्रमी खेळी केली आणि त्या जोरावर राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात मोठी धावसंख्या उभी केली. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याच्या पॅट कमिन्सचा निर्णय SRH च्या अंगलट आला अन् दडपणाखाली त्यांनी सपशेल शरणागती पत्करली. RR ने दणदणीत विजय मिळवून Qaualifier 2 मध्ये धडक दिली आणि आता शुक्रवारी, २९ मे रोजी त्यांना गुजरात टायटन्सचा सामना करावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com