Daily Panchang 21st may 2023
Daily Panchang 21st may 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 मे 2023

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : ज्येष्ठ शुद्ध २, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय सकाळी ७.०२, चंद्रास्त रात्री ८.४९, सूर्योदय ६, सूर्यास्त ७.०२, धनिष्ठा नवक समाप्ती स. ९.०५, मु. जिल्काद मासारंभ, भारतीय सौर वैशाख ३१ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९४ - ४३व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंडिया’ सुश्‍मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब पटकावला. हा किताब पटकावणारी ही पहिलीच भारतीय आहे.

  • २००० - ताऱ्यांच्या निर्मितीपासून विश्वाच्या निर्मितीपर्यंतच्या असंख्य कोड्यांचा खगोलशास्त्रीय वेध घेण्यासाठी खोडद येथे उभारण्यात आलेली जगातील सर्वांत मोठी मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

  • २००२ - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा मानाचा ‘चित्रभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना जाहीर.

  • २००९ - पुण्याची धाडसी तरुणी कृष्णा पाटीलने १९व्या वर्षी एव्हरेस्ट सर करून सर्वांत कमी वयात एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.

  • २०१३ - महिला गिर्यारोहक अरुणिमा सिन्हाची सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई. एव्हरेस्ट सर करणारी ती पहिली दिव्यांग महिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT