पंचांग
रविवार : निज श्रावण शुद्ध ११, चंद्रनक्षत्र मूळ/पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, चंद्रोदय दुपारी ३.५०, चंद्रास्त उ. रात्री २.५९, पुत्रदा एकादशी, आदित्य पूजन, भारतीय सौर भाद्रपद ५ शके १९४५.
दिनविशेष
२००३ : साठ हजार वर्षांनी प्रथमच मंगळ ग्रह तीन वाजून एकवीस मिनिटांनी पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे पाच कोटी ५७ लाख ५८ हजार किलोमीटरवर आला. हे दोन्ही ग्रह पुन्हा इतके जवळ येण्यासाठी सन २२८७ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
२००४ : चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांच्या ‘वॉर अँड पीस’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार व सुवर्णकमळ जाहीर झाले.
२०१५ : क्रायोजेनिक तंत्रज्ञानाची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करत भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीएसएलव्ही डी-६ या भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाच्या साह्याने जी-सॅट ६ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.