Palmistry esakal
संस्कृती

Palmistry : हातावर असे निशाण असणारे लोक असतात पुतिनप्रमाणे राजेशाही, तुमच्याही हातावर आहेत का?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या हातातही हे शुभ चिन्ह दिसले आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Palmistry : हस्तरेषाशास्त्र हे अतिशय प्राचीन शास्त्र आहे. यावरून व्यक्तीची मनस्थिती कळू शकते. पण आज आम्ही तुम्हाला तळहातातील त्या खूणाबद्दल सांगणार आहोत, जे जगातील फक्त 3 टक्के लोकांच्या हातातच दिसतात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या हातातही हे शुभ चिन्ह दिसले आहे.

एवढेच नाही तर ग्रीसचा महान योद्धा अलेक्झांडरच्या दोन्ही हातांमध्ये एक अद्भुत योगायोग होता. वास्तविक हे चिन्ह इंग्रजी अक्षर X चे आहे, जे संपूर्ण जगात फक्त 3 टक्के लोकांच्या दोन्ही हातात आहे. मॉस्कोच्या एसटीआय विद्यापीठाच्या एका संशोधन लेखात हे सांगण्यात आले आहे.

या लेखात जगातील करोडो लोकांशी बोलले गेले आणि त्यांच्या हातावरील रेषांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला. या संशोधनात संशोधकांनी जिवंत आणि मृत व्यक्तींची माहिती गोळा केली. संशोधनानंतर असे समोर आले की ज्यांच्या हातावर X ची खूण होती ते मोठे नेते, लोकप्रिय व्यक्तिमत्व किंवा महान कार्य करणारे लोक होते. (vladimir-putin)

ज्या लोकांच्या दोन्ही हातात X चे चिन्ह असते त्यांचे नशीब खूप बलवान असते. यश त्यांच्या दारी स्वत: येतं आणि त्यासाठी त्यांना जास्त कष्ट करावे लागत नाहीत. विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष रणनीती बनवण्याची गरज नाही.

हस्तरेषा शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या हातात असा संयोग असेल तर त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. ज्या लोकांच्या हातात हे चिन्ह असते, ते महान कार्य करतात आणि प्रसिद्धही होतात. मृत्यूनंतरही लोक त्यांची आठवण ठेवतात. (Astrology)

डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी आहे. सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanchita Ugale: एक्स प्रियकराचा त्रास, आरोग्य समस्या की नैराश्य? अभिनेत्री संचिता उगलेने का संपवलं आयुष्य? मैत्रिणीनं सगळंच सांगितलं!

FDA चा छापा; ५५ हजाराचा गुटखा जप्त, पण मकोकाअंतर्गत गुन्हा नाही, तुकाराम मुंढेंचे आदेश असतानाही टाळाटाळ?

Latest Marathi News Live Update : अमरावतीत दमदार पावसाची हजेरी

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT