Daily Panchang  sakal
संस्कृती

Panchang 18th Oct. : मंगळवारी लाल वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५४ ते स.११:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक १८ ॲाक्टोबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २६ शके १९४४

सूर्योदय ०६:३३ वाजता तर सूर्यास्त १८:०७ वाजता आहे. चंद्रोदय रात्री २४:५७ वाजता आहे. प्रात: संध्या सकाळी ०५:१८ ते ०६:३३ वाजेपर्यंत करावी. सायं संध्या १८:०७ ते १९:२१ या काळात करावी. अपराण्हकाळ १३:२९ ते १५:४८ दरम्यान असणार आहे. प्रदोषकाळ १८:०६ ते २०ः२६दरम्यान असेल. निशीथ काळ २३:५५ ते २४:४५ वाजेपर्यंत आहे. तर, राहु काळ १५:१३ ते १६:४० दरम्यान असणार आहे. यमघंट काळ ०९:२६ ते १०:५३ आहे.

श्राद्धतिथी नवमी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५४ ते स.११:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी पडवळ खावू नये. या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १०:५३ ते १२:२०

  • अमृत मुहूर्त--  १२:२० ते १३:४६

  • विजय मुहूर्त— १४:१७ ते १५:०४

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर आहे. राहु मुखात आहुती आहे. शिववास ०९:५८ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी ०९:५८ प.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - आश्विन

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - अष्टमी(०९:५८ प.नं.नवमी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - पुष्य(अहोरात्र)

  • योग - सिद्ध(१७:१५ प.नं.साध्य)

  • करण - कौलव(०९:५८ प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - कर्क

  • सूर्य रास - कन्या(०९:२५ नं.तुळ)

  • गुरु रास - मीन

विशेष:- रवि तुळेत स.०९:२५, विषुव संक्रांती पुण्यकाळ सूर्योदय ते दुपारी ०३:२५, तिळदान, गोरसदान करावे. या दिवशी पाण्यात रक्तचंदन टाकून स्नान करावे. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. गणपतीस गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस तीळ दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT