Paryushana Parv 2022 esakal
संस्कृती

Paryushana Parv 2022 : पर्युषण पर्व म्हणजे काय? जैन समाजातील सर्वात मोठे पर्व

पर्युषण पर्वाला Paryushan Parva जैन समाजात सर्वात मोठे पर्व मानला जाते आणि त्यामुळे त्याला पार्वधिराज असेही म्हटले जाते.

सकाळ डिजिटल टीम

जैन समाजाचा सर्वात पवित्र उत्सव म्हणजेच पर्युषण पर्व आहे. या पर्वात जैन धर्माच्या पाच सिद्धांताचे पालन केले जाते. हे पाच सिद्धांत म्हणजे सत्य, अहिंसा, सतेय ,ब्रह्मचर्य, आणि अपरिग्रह हे होय. यंदा याची सुरुवात 24 ऑगस्ट पासून होणार आहे. जैन धर्मातील श्वेतांबर पंथातील बांधव हे 8 दिवस पर्युषण पर्व साजरा करतात. तर दिगंबर पंथातील बांधव हे 1 सप्टेंबर पासून पूढील दहा दिवस पर्युषण पर्व साजरा करतात. या पर्वात जैन बांधव संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात. हिंदू धर्मातील नवरात्र प्रमाणे जैन समाजात पर्युषण पर्व साजरा केला जातो.

पर्युषण पर्वात जैन समाजातील श्वेतांबर आणि दिगंबर बांधव पवित्र व्रताचे पालन करतात. पर्युषण पर्वाला जैन समाजात सर्वात मोठे पर्व मानला जाते आणि त्यामुळे त्याला पार्वधिराज असेही म्हटले जाते. या पर्वात जैन धर्माच्या पाच सिद्धांताचे पालन केले जाते. हे पाच सिद्धांत म्हणजे सत्य, अहिंसा, असतेय ,ब्रह्मचर्य, आणि अपरिग्रह आहेत. जैन धर्माचे मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दाखवतो. या पर्युषण पर्वात जैन धर्मीय नागरिक संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात. आणि आपल्याकडून झालेल्या चुकां बाबत माफी मागतात.

या उत्सवात जैन बांधव संपूर्ण भक्ती भावाने धार्मिक उपवास करतात. पावसाळ्यात हा पर्व साजरा केला जातो, पावसाळ्यातील चार महिन्यात पृथ्वीतलावर सर्वत्र हिरवळ वाढते. या काळात बऱ्याच प्रकारचे प्राणी सूक्ष्मजीव जन्माला येत असतात. हे सर्व लक्षात घेऊन जैन साध्वीनी या काळात एका ठिकाणी राहून देवाची उपासना करण्याचा संदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

Numerology for Pets: कुत्रा, मांजर, मासे की पक्षी? अंकशास्त्रानुसार पाहा तुमच्या मूलांकासाठी कोणता प्राणी आहे लकी...

Indian Army: पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताच्या ड्रोनवर अमेरिकेची नजर; युद्ध सरावादरम्यान काय घडलं?

दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा थेट CM Devendra Fadnavis यांना सवाल

SCROLL FOR NEXT