Pitru Paksha sakal
संस्कृती

Pitru Paksha 2023: पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये? सर्व महत्वाचे नियम जाणून घ्या

पितृ पक्ष हा पितरांचा आदर करण्याचा काळ आहे.

Aishwarya Musale

यावर्षी पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 पासून सुरू होत असून तो 14 ऑक्टोबरला संपेल. पितृ पक्षाच्या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्त्व आहे.

श्राद्ध म्हणजे भक्तीभावाने केलेला विधी, ज्यामुळे पितरांना समाधान मिळते. परंतु शास्त्रांमध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन पितृ पक्षाच्या काळात करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया पितृ पक्षाच्या दिवसात काय करावे आणि काय करू नये…

पितृ पक्षात काय करावे?

  • सर्वप्रथम पितृ पक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते.

  • पितृपक्षाच्या दिवसात पितरांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते नंतर गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना खाऊ घाला. त्यांच्याद्वारे हे अन्न पितरांपर्यंत पोहोचते, अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे.

  • पितृ पक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे. यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि आशीर्वाद मिळतो.

  • पितृ पक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण (पिंडदान वैगेर) अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागेल.

पितृ पक्षात काय करू नये?

  • पितृ पक्षाच्या दिवसात लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. तसेच या दिवसात तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका.

  • कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृ पक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे.

  • पितृ पक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT