Pind Daan Sakal
संस्कृती

Pitru Paksha 2023: पिंडदानासाठी काशी,प्रयागराजला जाणं शक्य नाही? आता ऑनलाईन होतील सगळे विधी

प्रयागराज, काशी आणि गया इथं पितृपक्षात पिंडदान कऱण्याला विशेष महत्त्व आहे.

वैष्णवी कारंजकर

पितृपक्षाची सुरुवात होत आहे. या काळामध्ये देशभरातून लोक पिंडदानासाठी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं येतात. या भागाला संगम नगरी म्हणूनही ओळखलं जातं. पण काही लोक असेही आहेत, जे परदेशात आहेत किंवा प्रयागराजला येऊ शकत नाहीत, अशा लोकांसाठी यंदा विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आता पिंडदान ऑनलाईनही करता येणार आहे. प्रयागराज इथल्या पुरोहितांनी मिळून एक वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांना बुकिंग मिळायलाही सुरुवात झाली आहे. स्थानिक पुरोहितांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी पिंडदान ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, तशी सुविधा आम्ही लोकांना देत आहे. धार्मिक कार्यांचंही आता डिजिटलायझेशन होत आहे.

कोरोना काळामध्येसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती. लोक पिंडदान करण्यासाठी प्रयागराज किंवा इतर कुठे बाहेर जाऊ शकत नव्हते. तेव्हा लोकांनी इथल्या पुरोहितांना सांगून घरी बसूनच पुरोहितांच्या साहाय्याने पिंडदान केलं होतं. आता पुन्हा एकदा पिंडदानासाठी डिजिटल पद्धत वापरली जात आहे.

प्रयागराजमध्ये यंदा पितृपक्षाच्या कालावधीत बाहेर असणाऱ्या किंवा प्रयागराजला येऊ न शकणाऱ्या लोकांनासाठी एक वेबसाईट तयार केली जात आहे. या वेबसाईटवर देशाच्या बाहेर राहणाऱ्या बऱ्याचशा लोकांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे. या वेबसाईटचं नाव आहे पिंडदान डॉट कॉम.

पिंडदानासाठी हॉलंड, मॉरीशस आणि कॅनडामधल्या भारतीय लोकांनी बुकिंग केले आहेत. प्रयागराज इथले पुरोहित प्रदीप कुमार पांडे यांनी सांगितलं की, आत्तापर्यंत ऑनलाईन माध्यमातून आठ जणांची बुकिंग झाली आहे. पिंडदानासाठीच्या या वेबसाईटवरुन अनेक अर्ज आले आहेत. पण अजून निश्चिती झालेली नाही. प्रदीप कुमार यांनी सांगितलं की पिंडदानाची ही प्रक्रिया ऑनलाईन, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून होईल. दक्षिणेचे पैसेसुद्धा ऑनलाईन स्वरुपात घेतले जातील.

आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी पितृपक्षात पिंडदान केलं जातं. हे पिंडदान प्रयागराज, काशी आणि गया इथं कऱण्यासाठी विशेष महत्त्व आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक पिंडदानासाठी प्रयागराज इथं येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT