Pitru paksha 2023  Esakal
संस्कृती

Pitru paksha 2023 : यंदा पितृपक्ष कधी पासून सुरू होणार ?

या वर्षी अधिक मासमुळे तो ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरू राहणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. असे मानले जाते की, पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते त्यांच्या वंशजांना सुख-समृद्धी देतात. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पुढे तो 15 दिवस चालतो. पितृपक्षात पितर कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात असे मानले जाते

हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा पितृपक्ष 29 सप्टेंबर2023 रोजी सुरू होतो आणि 14 ऑक्टोबर रोजी संपतो. पंडित प्रभू दयाळ दीक्षित यांच्या मते, यंदा अतिरिक्त महिन्यामुळे सावन महिना 59 दिवसांचा आहे. या कारणास्तव सर्व उपवास आणि सण 12 ते 15 दिवस उशिरा येतील. दरवर्षी पितृपक्ष सप्टेंबर महिन्यात संपतो, परंतु या वर्षी अधिक मासमुळे तो ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरू राहणार आहे.

श्राद्ध तिथीची यादी

29 सप्टेंबर – पौर्णिमा श्राद्ध

30 सप्टेंबर – प्रतिपदा श्राद्ध, द्वितीया श्राद्ध

01 ऑक्टोबर – तृतीया श्राद्ध

02 ऑक्टोबर – चतुर्थी श्राद्ध

03 ऑक्टोबर – पंचमी श्राद्ध

04 ऑक्टोबर – षष्ठी श्राद्ध

05 ऑक्टोबर – सप्तमी श्राद्ध

06 ऑक्टोबर – अष्टमी श्राद्ध

07 ऑक्टोबर – नवमी श्राद्ध

08 ऑक्टोबर – दशमी श्राद्ध

09 ऑक्टोबर – एकादशी श्राद्ध

11 ऑक्टोबर – द्वादशी श्राद्ध

12 ऑक्टोबर – त्रयोदशी श्राद्ध

13 ऑक्टोबर – चतुर्दशी श्राद्ध

14 ऑक्टोबर – सर्व पितृ अमावस्या

पितृ पक्षातील श्राद्धाचे काय महत्त्व आहे.पितृपक्षाच्या काळात पितरांचे श्रद्धेने स्मरण करून श्राद्ध विधी केले जातात.पितृपक्षात पितरांना नैवेद्य दाखवण्याचे विशेष महत्त्व आहे.श्राद्ध कर्म केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT