Pitru Paksha 2023 esakal
संस्कृती

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात कावळ्याला एवढं महत्व का? त्यामागे आहे महत्वाचं कारण

ज्या कावळ्याला अंगणात काव काव करताच लोक हाकलून लावतात त्या कावळ्याला पितृ पक्षात एवढे महत्व का?

सकाळ ऑनलाईन टीम

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षाला कालपासून सुरुवात झाली आहे. या काळात पितरांच्या तृप्तीसाठी आणि शांतीसाठी पिंडदान केले जाते. या पंधरा दिवसांचे धार्मिक महत्व आहे. मात्र एरवी कोणाकडूनही ज्याची आठवण होत नाही, ज्या कावळ्याला अंगणात काव काव करताच लोक हाकलून लावतात त्या कावळ्याला पितृ पक्षात एवढे महत्व का?

ज्ञानेश्वरीत माऊलींनी असे म्हटले आहे की, 'पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' अर्थात कावळ्याची काव काव शकुन आहे असे माऊलींनी सांगितले आहे.

कावळ्याची काव काव ऐकून अनेकांनी जरी त्याला अंगणातून हाकलून लावले असेल तरी कावळ्याची चपळता, सुक्ष्म दृष्टी आणि सावधपणा लक्षात घेऊन यमराजांनी त्याला आपले दूत बनवले होते. म्हणून पितृपक्षात घरोघरी त्याला बोलावले जाते. कावळ्याला दिसलेले अन्न यमराजपर्यंत पोहोचून पितरांना पोहोचते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे पितृपक्षाचा पंधरवाडा कावळ्यासाठी मानाचा असतो. (Pitru Paksha)

पितरांच्या वासना व नैवेद्य ठेवण्याचे मन दुष्ट असेल तर कावळा पिंडाकडे बघतसुद्धा नाही. एवढा तो एकनिष्ठ असतो. जेव्हा व्यक्ती त्याची चूक मान्य करून पितरांच्या इच्छांच्या पूर्तीची हमी देतो तेव्हा कावळा पिंडाला शिवतो अशी मान्यता आहे.

कावळ्याच्या विष्ठेतून नकळत का होऊना पण वड, पिंपळासारख्या वृक्षाची लागवड होते. जे मिळेल ते खाऊन कावळा जगतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT