Pitru Paksha 2023 esakal
संस्कृती

Pitru Paksha 2023 : श्राद्ध अन् पिंडदानासाठी ही 5 ठिकाणं पवित्र मानली जातात, पितरांना मिळतो मोक्ष

भारतातील ही ५ ठिकाणं पिंडानासाठी पवित्र मानली गेली आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात पितरांच्या शांती आणि तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला पितृपक्षास सुरुवात होते. असे मानले जाते की पितृ पक्षात पिंडदान केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. भारतातील ही ५ ठिकाणं पिंडानासाठी पवित्र मानली गेली आहे. चला तर त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

वाराणसी

हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये वाराणसीला मोक्ष नगरी म्हटले आहे. असे मानले जाते की वाराणसीमध्ये विधीपूर्वक पिंड दान केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो. या ठिकाणी पिंडदान करणारा व्यक्ती पिंडदान केल्यानंतर वाराणसीमधील बाबा विश्वनाथांचे दर्शन आवर्जून घेतो.

गया (बिहार)

बिहारमधील बोधगया फल्गु नदीच्या तिरावर वसलेले आहे. असे मानले जाते की या नदीच्या तीरावर पिंडदान केल्यास स्वर्गात स्थान मिळते आणि आपण जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो. या ठिकाणाचे वर्णन रामायणात देखील आहे. पिंडदानासाठी गयामध्ये २० पेक्षा अधिक ठिकाणे आहेत. हे ठिकाण बोधगया पासून १३ किलोमीटर उत्तरेकडे तर पटनापासून १०० किलोमीटर दक्षिण दिशेला आहे.

ब्रम्ह कपाल, बद्रीनाथ उत्तराखंड

बद्रीनाथमधील ब्रम्हकपाल घाटाबाबत असे म्हटले जाते की, इथे केलेले पिंडदान ८ पटीने जास्त फलदायी असते. इथे पिंडदान आणि श्राद्ध केल्यास अकस्मात मृत्यू झालेल्या पितरांना लगेच मुक्ती मिळते. हे तेच ठिकाण आहे जिथे महादेवास ब्रम्हहत्येच्या पापातून मुक्ती मिळाली होती.

पुष्कर, राजस्थान

राजस्थानमधील धार्मिक स्थळ पुष्करसुद्धा श्राद्धासाठी पवित्र स्थान मानले जाते. इथे ब्रम्हाजींचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. येथील तलावाबाबत असे म्हटेल जाते की, याची उत्पत्ती भगवान विष्णूच्या नाभीतून झाली होती. येथील ५२ घाटांवर दरवर्षी लोक पिंडदानासाठी दूरून येतात.

हरिद्वार

लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, हरिद्वारमधील गंगा नदीकाठी पितरांचे पिंडदान केल्यास पितरांमा मोक्ष प्राप्त होतो. पिंडदानानंतर इथे लोक गंगा किनाऱ्यावरील आरती आणि नंतर मंदिरांचे दर्शन आवर्जून घेतात. (Pitru Paksha)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT