Rakshabandhan  sakal
संस्कृती

Raksha Bandhan 2023 : आपल्या लाडक्या भावासाठी राखी खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी?

रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींमधील पवित्र बंध साजरा करणारा सण आहे.

सकाळ डिजिटल टीम

रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींमधील पवित्र बंध साजरा करणारा सण आहे, जो श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन 30 ऑगस्टला आहे. बहुतेक वेळा असे घडते की, रक्षाबंधनावर भद्रा काळाचा परिणाम होतो आणि भाऊ-बहिणीच्या या सणात अडचण येते. यावेळीही रक्षाबंधनावर भद्राची छाया असल्यासारखे आहे. तिथी आणि भद्राच्या फेरफारामुळे यावेळीही रक्षाबंधन 2 दिवस साजरे केले जाणार आहे. म्हणजेच 30 आणि 31 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. या भद्रा काळामुळे रात्री बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकतील. 

बाहेरगावी असणाऱ्या भावाला राखी पाठवण्यासाठी बहिणींची राखी खरेदीची लगबग दिसून येते आहे. राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. नाही तर शुभ ऐवजी अशुभ फळ मिळेल असं ज्योतिषशास्त्र पंडीत सांगतात.फॅशन राखी घेताना अशुभ गोष्टींची खरेदी करु नका. काळ्या धाग्याची किंवा काळ्या रंगाची राखी कधीही घेऊ नका. काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक असतं. लहान मुलांसाठी कार्टूनची राखी बाजारात मिळते. या राख्या अजिबात खरेदी करु नका.

या राख्यांवर कधी-कधी क्रॉस, हाफ वर्तुळ असतात ते अशुभ मानलं जातं. याचा परिणाम भावाच्या आयुष्यावर होतो. राख्या घेताना त्यावर बनवलेल्या चिन्ह बघून त्याची खरेदी करा. प्रतिमा रक्षा सूत्र म्हणजेच मॉली ही सर्वात शुद्ध आणि पवित्र राखी असते. यासोबतच फुलं आणि मोत्यांनी बनवलेली राखी भावासाठी शुभ असते. भावाच्या मनगटावर देवी-देवतांचे चित्र असलेली राखीही बांधू नये.

अनेकवेळा राखी तुटून पडते किंवा नकळत घाणेरडे हात असतात. अशावेळी देवांचा अपमान होतो. राखी घेताना त्या तुटलेल्या किंवा त्या बांधताना तुटतील अशा घेऊ नयेत. कारण त्या अशुभ असतात. तुमच्या घरात जुनी राखी पडली असेल तर ती फेकून देऊ नका. ती वाहत्या नदीत किंवा तलावात विसर्जित करा.मिठाईमध्येही काळा आणि तपकिरी रंग टाळावा. चॉकलेटसोबतच लाडू, दूध बर्फी, केशर बर्फी, स्पंज, रसमलाई यासारखे गोड पदार्थ तुम्ही घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT