Ram Navami 2023 esakal
संस्कृती

Ram Navami 2023 : पुनर्वसु नक्षत्रावर झाला होता श्री रामाचा जन्म, कथा अन् महत्व जाणून घ्या

राम जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती फार शुभ मानली जाते.

सकाळ डिजिटल टीम

Ram Navami Katha And Mahatmya : राम नवमीला पुनर्वसु नक्षत्राला श्रीरामांचा जन्म झाला होता. श्रीरामांच्या जन्माच्यावेळी ग्रहांची स्थिती फार शुभ होती. या दिवशी पाच ग्रह सूर्य, मंगळ. गुरू, शुक्र आणि शनि आपल्या उच्च राशीत स्थित होते. या ग्रहांच्या शुभ प्रभावात त्रेता युगात राजा दशरथाच्या घरी विष्णू अवतार, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म झाला.

राम जन्माची कथा

पौराणिक कथांनुसार श्रीरामांचा जन्म त्रेता युगात झाला. राजा दशरथाने पुत्रेष्टी यज्ञ केला आणि त्यात प्राप्त झालेल्या प्रसादाची खीर त्यांनी पत्नी कौशल्येला दिली. त्यातून अर्धा हिस्सा कौशल्येने कैकैला दिला. मग आपल्यातला अर्धा अर्धा हिस्सा दोघींनी तिसरी राणी सुमित्राला दिला. या खिरी मुळा चैत्र शुक्ल नवमीला पुनर्वसु नक्षत्राला, कर्क लग्नात माता कौशल्येच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला. अशाच प्रकारे कैकै कडून भरत आणि सुमित्राकडून लक्ष्मण आणि शत्रुघ्नचा जन्म झाला.

कशी साजरी करावी राम नवमी

राम नवमीला सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर संपूर्ण दिवसभर नियम आणि संयमाने मर्यादा पुरुषोत्तमाचे व्रत करावे. त्यानंतर श्री राम, लक्ष्मण, सीता माता आणि हनुमानजी अशी सगळ्यांची आरती करावी.

ब्राह्मण तसेच गोर गरिबांना जेवू घालावे. प्रसाद वाटावा. या दिवशी रामचरित मानसचे पठण करावे. या दिवशी उपवास ठेवल्याने सुख-समृद्धी मिळते. पाप दोष निवारण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT