Rama Ekadashi 2023 esakal
संस्कृती

Rama Ekadashi 2023 : रमा एकादशी कधी आहे?जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

सगळ्या एकादशींपैकी सर्वात शुभ म्हणून रमा एकादशी महत्वाची मानली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Rama Ekadashi 2023 : हिंदू पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातीला एकादशीला रमा एकादशी साजरी केली जाते. या दिवशी रमा एकादशीचे व्रत ही आवर्जून केले जाते. सर्व एकादशींपैकी सर्वात शुभ एकादशी म्हणून रमा एकादशी ही महत्वाची मानली जाते. या एकादशीला रंभा एकादशी असे ही म्हटले जाते.

रमा एकादशी ही दरवर्षी दिवाळीच्या चार दिवस आधी येते. त्यामुळे, या एकादशीला विशेष महत्व आहे. या दिवशी जगाचे पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूंची पूजा करण्याची आणि व्रत करण्याची मोठी परंपरा आहे.

रमा एकादशीचे व्रत अनेक जण करतात. हे व्रत केल्याने अनेक प्रकारची पापे नष्ट होतात असे मानले जाते. त्यामुळे, या एकादशीच्या दिवशी व्रत करण्याचे खास महत्व आहे. चला तर मग जाणून घेऊयात या वर्षी रमा एकादशी कधी आहे? याची तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊयात.

कधी आहे रमा एकादशी?

या वर्षी रमा एकादशी ही ९ नोव्हेंबरला गुरूवारी असणार आहे. ही रमा एकादशीची तिथी सकाळी 8 वाजून २३ मिनिटांनी सुरू होणार असून ती १० वाजून ४१ मिनिटांनी समाप्त होईल.

या वर्षी उदया तिथीला एकादशी आल्याने रमा एकादशीचे हे व्रत ९ नोव्हेंबरला पाळले जाणार आहे. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी १० नोव्हेंबरला सकाळी 6 वाजून ३९ मिनिटे ते ८ वाजून ५० मिनिटे या वेळेत व्रत सोडणे हे शुभ असणार आहे.

पूजेचा शुभ मुहूर्त

रमा एकादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा ९ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी सुरू होणार असून तो ८ वाजेपर्यंत असणार आहे.

रमा एकादशीचे व्रत आणि पूजा विधी

  • रमा एकादशीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे.

  • स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे.

  • त्यानंतर, भगवान विष्णूंची मूर्ती किवा फोटोची प्रतिष्ठापणा करावी.

  • त्यानंतर, मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून रमा एकादशीच्या व्रताचा संकल्प करावा.

  • त्यानंतर, भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करावी.

  • सर्वात आधी विष्णूंच्या मूर्तीचे पंचामृताने स्नान करावे.

  • आता स्नान झाल्यानंतर, मूर्तीला फूले वहावीत.

  • निरांजन लावावे, धूप दाखवावे आणि मूर्तीला नैवेद्य दाखवावा.

  • हा सर्व विधी झाल्यानंतर, विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून विष्णूसहस्त्रनामाचा जप करावा आणि भगवान विष्णूंची कथा ऐकावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा..

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT