Rudraksha and Lord Shiva Esakal
संस्कृती

Shravan 2022: जिथे भगवान शिव तिथे रुद्राक्ष का असतो?

शिवपूजनात प्रामुख्याने वाहिल्या जाणाऱ्या बेल अत्यंत गुणकारी आहे. त्याचप्रमाणे शिवनाथाच्या अश्रुतून निर्माण झालेल्या रुद्राक्षाची महतीही थोर आहे. रुद्राक्षाचे आध्यात्मिक महत्त्व जेवढे अद्भूत आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रावण महिना शिवपूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. शिवपूजनात प्रामुख्याने वाहिल्या जाणाऱ्या बेल अत्यंत गुणकारी आहे. त्याचप्रमाणे शिवनाथाच्या अश्रुतून निर्माण झालेल्या रुद्राक्षाची महतीही थोर आहे. रुद्राक्षाचे आध्यात्मिक महत्त्व जेवढे अद्भूत आहे, तेवढेच अनेक रोगांवर आणि आजारांवर रुद्राक्ष अत्यंत गुणकारी व विशेष वैशिष्ट्यपूर्ण मानला गेला आहे. श्रावण, महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले गेले आहे. मात्र, रुद्राक्ष खरा आहे की नाही, याची खात्री करून मगच तो धारण करावा, असा सल्ला प्रामुख्याने दिला जातो. रुद्राक्ष खरा नसेल, तर तो धारण करून त्याचे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे खात्री केल्याशिवाय रुद्राक्ष धारण करू नये. रुद्राक्षाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...

श्रावण महिना शिवपूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. पार्वती देवीने शंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती, त्याचे फळ तिला श्रावण महिन्यात मिळाले होते. त्यामुळे शिवाला प्रसन्न करून घ्यायचे असल्यास श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. श्रावणात शिवपूजनात बेलाचे पान विशेष करून वाहिले जाते. महादेव शिवशंकराला केवळ एक बेलाचे पान वाहिले तरी, संपूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते

उत्तर भारतात श्रावण मासारंभ झाला असून, महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आजपासून म्हणजे 29 जुलै 2022 पासून श्रावण महिना सुरू होत आहे.भगवान शिवाप्रमाणे त्यांची प्रतीकेही अत्यंत महत्त्वाची, वैशिष्ट्यपूर्ण आणि गुणकारी मानली जातात. शिवपूजनात प्रामुख्याने वाहिल्या जाणाऱ्या बेल अत्यंत गुणकारी आहे. त्याचप्रमाणे शिवनाथाच्या अश्रुतून निर्माण झालेल्या रुद्राक्षाची महतीही थोर आहे. रुद्राक्षाचे आध्यात्मिक महत्त्व जेवढे अद्भूत आहे, तेवढेच अनेक रोगांवर आणि आजारांवर रुद्राक्ष अत्यंत गुणकारी व विशेष वैशिष्ट्यपूर्ण मानला गेला आहे.

● रुद्राक्ष (Rudraksha)

रुद्राक्षाच्या वृक्षालाच रुधिरवृक्ष असे म्हणतात. त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव 'एलिओकार्पस स्फेरिकस' असे आहे. हा सदाहरित वृक्ष हिमलयाच्या पायथ्याच्या डोंगराळ प्रदेशाच्या जंगलात आढळतो. या झाडाचे लाकूड, हलके, मजबूत व चिवट असते. या झाडाची पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी पण टोकदार, थोडी, लांब असतात. या वृक्षाला पानांच्या बंगलेत लोंब्या येऊन पांढरीशुभ्र, मंद वासाची फुले येतात.एप्रिल ते जुलै या काळात या वृक्षाला बोराच्या आकाराची गोल, जांभळट रंगाची फळे येतात. मेंदुचे विकार व अपस्माराचे झटके या विकारावर तो औषध म्हणून उपयोगी आहे. ही फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात. आतील बी रुद्राक्ष म्हणून ओळखली जाते. रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो पक्का असतो. उच्च रक्त दाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रुपात परिधान केला जातो. अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे. हिंदू, बौद्ध, शीख व मुस्लिम धर्मामध्येही रुद्राक्ष पवित्र मानतात.

● रुद्राक्ष शब्दाचा अर्थ काय होतो ?

तारकापुत्र अधर्माचरण करू लागल्याने विषादाने शंकराच्या नेत्रांतून पडलेल्या अश्रूंचे ‘रुद्राक्षवृक्ष’ होणे आणि शिवाने तारकापुत्रांचा नाश करणे. अक्ष म्हणजे डोळा. रुद्र ±अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो तो रुद्राक्ष. अक्ष म्हणजे आस.डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो; म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात.

रुद्र म्हणजे रडका. ‘अ’ म्हणजे घेणे आणि ‘क्ष’ म्हणजे देणे; म्हणून अक्ष म्हणजे घेण्याची किंवा देण्याची क्षमता. याचाच दुसरा अर्थ म्हणजे रडणार्‍याकडून त्याचे दुःख घेण्याची आणि त्याला सुख देण्याची क्षमता असलेला ‘रुद्र ±अक्ष’ या दोन शब्दांपासून रुद्राक्ष हा शब्द बनला आहे.

देवीभागवत, शिवलीलामृत, शिवपुराण, स्कंदपुराण, पूरश्चरण-चंद्रिका, उमामहेश्वर तंत्र श्रीगुरुचारीत्र इत्यादी ग्रंथातून रुद्रक्षाचे सविस्तर वर्णन दिलेले आहे.

● शिव आणि रुद्राक्षाचे नातं काय आहे ?

एकमुखी रुद्राक्ष हा अत्यंत दुर्मिळ असतो. या एकमुखी रूद्राक्षाला शिवाचे रूप समजला जाते. हा रुद्राक्ष ज्याच्याजवळ असतो त्या व्यक्तीला शत्रूच असत नाहीत व त्याच्या घरात लक्ष्मी निरंतर वास करते, असे मानले जाते.

दोनमुखी रुद्राक्ष म्हणजे शंकर पार्वतीचे एकत्र रूप समजले जाते. अग्निरुपात असलेला तीनमुखी रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही, असे मानले जाते. चारमुखी रुद्राक्षाच्या पूजनाने धनप्राप्ती होते व असलेला पैसा अस्थानी खर्च होत नाही, अशी मान्यता आहे.

पाचमुखी रुद्राक्ष काळाचा शत्रू असून, याच्या पूजनाने अकाली मृत्यू येत नाही, असे सांगितले जाते. सहामुखी रुद्राक्षाची कार्तिकेय स्वरूपात गणना केली जाते व तो शक्तीवर्धक समजला जातो. सप्तमुखी रुद्राक्षाच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Kasba Beed Gold Coins : शिलाहार राजवंशाची उपराजधानी असलेल्या कोल्हापूरच्या 'या' गावात पुन्हा सापडल्या सुवर्णमुद्रा! काय आहे अतिप्राचीन 'बेडा' आणि त्रिशूळाचे रहस्य?

SCROLL FOR NEXT