संस्कृती

Vastu Tips : घरातील मोरपिस योग्य दिशेला लावलंय ना?, असल्यास भाग्य उजळेल

मोराचे पंख हे भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या दागिन्यांपैकी एक आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या देशात मोरपिसाबाबत अनेक प्रकारच्या समजुती आहेत. पुराणात मोरपंख हे देवतांचे अलंकार मानले गेले आहे. विशेषत: मोराचे पंख हे भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या दागिन्यांपैकी एक आहे. त्यामुळे कान्हाला मोराचे पिसे अर्पण केले जाते. वास्तुशास्त्रातही मोराच्या पिसांचं खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार मोराची पिसे घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. याशिवाय घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. एका ज्योतिषांनी मोराच्या पिसा संदर्भात काही सोपे उपाय सांगतिले आहेत. ते कोणते हे आपण जाणून घेणार आहोत.

मोराची पिसे कोणत्या दिशेला ठेवावीत?

  • ज्योतिष शास्त्रानुसार, मोराच्या पिसामध्ये सर्व देवी-देवता आणि नऊ ग्रह विराजमान आहेत, त्यामुळे ते घरात ठेवल्याने घरातील लोकांची आर्थिक उन्नती होते.

  • एका म्हणण्यानुसार, घरात मोराचे पंख असल्यास घरात कोणतेही संकट येत नाही आणि सुख-शांती राहते.

  • वास्तुशास्त्रानुसार मोराची पिसे नेहमी घराच्या आग्नेय दिशेला ठेवावीत. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील वातावरण चांगले राहते.

मोराच्या पिसांचा अपव्यय रोखतो

जर एखाद्या व्यक्तीला उधळपट्टीची सवय असेल किंवा कोणाकडे पैसे नसतील तर आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणी मोराची पिसे ठेवल्यास फायदा होईल. असे मानले जाते की, देवघर किंवा मंदिरात मोराची पिसे ठेवल्याने घरात समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगले संबंध निर्माण होतात.

मोराची पिसे काल सर्प दोषापासून आराम देतात

ज्योतिष शास्त्र मानते की, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्पदोष असेल तर त्या व्यक्तीने मोराच्या पिसांबाबत उपाय करावेत. यासाठी अशा व्यक्तीने उशीखाली सात मोराची पिसे ठेवून झोपावे. असे मानले जाते की हा उपाय केल्यास काल सर्प दोषापासून लवकर आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती; NIAची मुंबई उच्च न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT