Rishi Panchami bhaji Esakal
संस्कृती

Rishi Panchami: ऋषीपंचमीला ऋषी भाजी करण्याची काय आहे परंपरा?

गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते.

सकाळ डिजिटल टीम

काल आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पाच आगमन झालं आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते. महाराष्ट्रातील गावोगावी हरतालिकेप्रमाणेच ऋषी पंचमीचं सुद्धा व्रत मनोभावे केले जातं.

आपल्या संस्कृती ऋषीपंचमीच्या व्रताचं सुद्धा खूप महत्व असतं. भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषिपंचमी म्हणतात. यादिवशी ऋषिंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी सप्तऋषींची पूजा करून त्यांना वंदन केले जाते.

आता बघू या ऋषीपंचमीला ऋषी भाजी का केली जाते या विषयीची सविस्तर माहिती...

ऋषीपंचमीचं व्रत सवाशीण महिला करतात. या व्रताच्या दिवशी महिलांनी धान्य खाऊ नये अशी आख्यायिका आहे. आजही ग्रामीण भागात शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्न पदार्थ ऋषीपंचमीच्या दिवशी खाल्लेच जात नाहीत. अशी प्रथा आहे. म्हणूनच या दिवशी शेताच्या बांध्यावर उगवलेल्या रानभाज्या भाज्या आणि कंदमुळं खाल्ली जातात. आता या सर्व भाज्या शहरांमध्येही बाजारात उपलब्ध असतात. शहरांमध्ये काही भागात ग्रामीण भागातील भाजी विक्रेते या भाज्या विकायला घेऊन येतात.

ऋषीपंचमीला ऋषी भाजी करता कोणत्या भाज्या मिक्स केल्या जातात?
ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात आणि त्यांचीच एकत्रित भाजी या दिवशी बनविली जाते. या दिवशी ठरावीक रानभाज्या, भोपाळ, भेंडी, गवार अशा भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनविली जाते. त्यात लाल भोपळा,पडवळ या फळभाज्यांचा तर अळू, लाल माठ, टोकेरी माठ या पालेभाज्यांचा वापर केला जातो. त्याच बरोबर अंबाडी सुद्धा घातली जाते.अळूची पानं, लाल देठं, रताळं, कच्ची केळी, सुरण, लालभोपळा, शिराळी, लाल माठाचे देठ, कणीस, शेंगदाणे, खोबरं घालतात, मिरच्या घातलात. यात मुख्य भाजी ही अळूची असते त्यात या सगळ्या भाज्या एकत्र केल्या जातात. गणेशोत्सवा दरम्यान पावसाळा असतो आणि पावसाळ्यात अनेक पालेभाज्या सहज उपलब्ध असतात त्या भाज्यांचा वापर सुद्धा ऋषीपंचमीच्या भाजी मध्ये केला जातो. कोकणात सुद्धा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ऋषी पंचमीच्या या भाजीचे सुद्धा विशेष महत्व आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मोठा पराक्रम, मोडला मुंबई इंडियन्सचा विक्रम...

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

SCROLL FOR NEXT