IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

Royal Challengers Bengaluru break Mumbai Indians record : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आणखी एका ऐतिहासिक विक्रमावर आपले नाव कोरले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स मिळवत आरसीबीने आयपीएल इतिहासातील सर्वाधिक पॉवरप्ले विकेट्स घेणारा संघ बनण्याचा मान मिळवला.
Royal Challengers Bengaluru break Mumbai Indians record

Royal Challengers Bengaluru break Mumbai Indians record

esakal

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans IPL 2026 Final Marathi News: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या फायनलमध्ये दबदबा राखला. भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड आणि रसिख सलाम यांनी गुजरात टायटन्सच्या फलंदाजांना माघारी पाठवले. गुजरातला ८ बाद १५५ धावांवर रोखणाऱ्या RCB ने आजच्या सामन्यात मोठा विक्रम नावावर केला. आयपीएल इतिहासात असा पराक्रम करणारा तो पहिलाच संघ ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com