Sankashti Chaturthi 2024: Sakal
संस्कृती

Sankashti Chaturthi 2024: आज संकष्टी चतुर्थी, आपल्या हातांनी 'या' गोष्टींचे करा दान, बाप्पा दूर करेल सर्व दुःख

Sankashti Chaturthi September 2024: हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खुप महत्व आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी विघ्नराज संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्या हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Sankashti Chaturthi 2024: हिंदू धर्मात अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी विघ्नराज संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखील जाते. संकष्टी चतुर्थीला खुप महत्व आहे. या दिवशी बाप्पाची मनोभावे पुजा केली जाते. या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पुढील वस्तूंचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

शुभ मुहूर्त

संकष्टी चतुर्थी 20 सप्टेंबर रोजी रात्री 9:15 वाजता सुरू झाले आहे आणि 21 सप्टेंबरला संध्याकाळी 6:13 वाजता समाप्त होईल. तिथीनुसार आश्विनी महिन्यातील विघ्नराज संकष्टी चतुर्थी 21 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे.

सुख-समृद्धीसाठी करा करावे

ज्योतिष शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीला आपल्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना धान्य, फळे, कपडे यासारख्या गोष्टींचे दान करू शकता. हा उपाय केल्याने बाप्पा प्रसन्न होतात आणि जावनात सुख-समृद्धी येते. या दिवशी पितळ किंवा स्टीलची भांडीही दान करणे शुभ मानले जाते.

बाप्पाची कृपादृष्टी कायम राहील

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालणे फायदेशीर ठरते. हा उपाय केल्याने गणपतीसोबतच तुम्हाला गाई मातेचा आशीर्वादही प्राप्त होतो. तसेच शुभ परिणाम प्राप्त होतात. शक्य असल्यास या दिवशी हत्तीला चाराही खाऊ घालू शकता. यामुळे साधकाच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tree Fall Incident : पुण्यातील विमाननगरमध्ये चालत्या गाडीवर कोसळलं गुलमोहराचं झाड; सुदैवाने जीवितहानी टळली, पण वाहतूक कोंडीचा नागरिकांना फटका

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB वर आरोप... ते ५ परदेशी खेळाडूंसह खेळतात; विराट कोहली म्हणतो, मी अजूनही भारतीय... Video

MS Dhoni चा चित्रपट पाहून तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतला...

IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Latest Marathi News Live Update : बनावट जात प्रमाणपत्रावर निवडणूक जिंकणाऱ्या माजी नगरसेवकावर २० वर्षांनी गुन्हा

SCROLL FOR NEXT