Sant Dnyaneshwar Maharaj palkhi departs from Saswad splash of Bhandara rain sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : सासवडमधून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा निघताना भंडाऱ्याची उधळण व पावसाची हजेरी

पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांचा हरिनामाचा जयघोष

विलास काटे

जेजुरी : सासवडमधून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा निघताना पावसाचा हलकासा शिडकावा झाला. मात्र, त्यानंतर रखरख ऊन आणि वाऱ्यामुळे उडणाऱ्या धुळीत वारकऱ्यांना वाटचाल करावी लागली.

तरीही पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांचा हरिनामाचा जयघोष अखंड सुरू होता. मल्हारी देवाचे गोडवे गात वाटचाल करीत सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माउलींचा पालखी सोहळा मल्हारनगरीत दाखल झाला. जेजुरीकरांनी माउलींच्या सोहळ्यावर भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. तेव्हा वरुणराजालाही मोह आवरता नाही. पावसाचा हलकासा शिडकावा झाला. माउलींचा पालखी सोहळा मल्हारगडाच्या कुशीत थांबला.

ज्ञानेश्वर माउलींचे धाकटे बंधू संत सोपानदेवांच्या सासवडनगरीतून पालखी सकाळी सात वाजता जेजुरीकडे येण्यासाठी मार्गस्थ झाली. यादरम्यान, सासवडकरांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून, निरंजन ओवाळत पालखीचे स्वागत केले.

पालखी शहराबाहेर आल्यावर मुख्य रस्त्यावरील रथात ठेवली आणि बोराकेमळ्याची वाट पकडली. एकेक दिंड्या एकामागोमाग शिस्तीने पुढे सरकत होत्या.सासवड पुरंदरमधील अनेक ग्रामस्थ वारीत चालण्यासाठी सामील झाले होते.

वाटेत बोरावके मळ्यात शेताशिवाराचा आनंद घेत सकाळची न्याहारी व यमाई शिवरीत भोजन केले. सकाळची वाटचाल आल्हाददायक होती. मात्र पुढे शिवरीच्या मार्गावर ऊन होते. पुढे बेलसर फाटा येथे उन्हाचा तडाखा जाणवत होता.

अंगातून घाम वाहत होता. सासवड-जेजुरी मार्गाचे काम सुरु असल्याने धुळीचा उपद्रव वारकर्‍यांना झाला. ठिकठिकाणी स्थानिक तसेच पुण्यातील व्यापारी सार्वजनिक संस्थानी भाविकांना जेवण, थंड पाणी, सरबत यांचे वाटप केले.

दुपारनंतर सोहळ्यातील वारक-यांनी जेजुरीगडाचे दुरूनच दर्शन होताच झपाझप पावले टाकत वाटचाल केली. पालखीने सासवड ते जेजुरी हा सतरा किलोमीटरचा टप्पा पार केला. पालखीने सायंकाळी पाच वाजता जेजुरीनगरीत प्रवेश केला. शहरात प्रवेश करताच ठिकठिकाणी माऊलींच्या रथावर आणि सोहळ्यावर भंडाऱ्याची व खोबऱ्याची उधळण करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT