Shani Uday esakal
संस्कृती

Shani Uday : 33 दिवसाच्या अस्तानंतर वाढणार शनिचा प्रभाव, देशात अन् जगात मोठे बदल अन् राशींवर प्रभाव

मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर साडेसाती, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर ढय्याचा प्रभाव राहील

सकाळ ऑनलाईन टीम

Shani Uday : 5 फेब्रुवारी रोजी शनी, सूर्याजवळ 15 डिग्री आल्याने अस्त झाला होता. यामुळे 12 राशींवर शनीचा पूर्ण प्रभाव पडत नव्हता. 10 मार्चला शनीचा उदय होत आहे. आता कुंभ राशीत स्थित शनीचा सर्व राशींवर प्रभाव राहील. यामुळे दुष्कर्म करणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. शनीच्या प्रभावाने सर्व राशीच्या लोकांना आपापल्या कर्मानुसार फळ मिळेल. मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर साडेसाती, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर ढय्याचा प्रभाव राहील.

सुमारे 1 महिना अस्त राहिल्यानंतर शनी आज म्हणजेच शुक्रवारी १० मार्चला पुन्हा उदय झाला आहे. आता वर्षभर उदय राहील. परंतु 17 जून रोजी कुंभ राशीत वक्री होईल. म्हणजेच तो वाकड्या चालीने चालायला सुरुवात करेल. यानंतर, 4 नोव्हेंबरपासून मार्गी होईल. शनीचा प्रभाव वर्षभर दिसून येईल.

शनीच्या चालीतील बदल या वर्षात राजकारणात मोठे बदल घडवून आणू शकतात. मेहनती लोकांसाठी हा काळ चांगला राहील. खालच्या वर्गातील लोकांना पुढे जाण्याची संधी मिळेल. देशात बांधकामाचे काम वाढेल. कारखाने आणि यंत्रसामग्रीशी संबंधित वस्तूंच्या किमती वाढू शकतात.

देश आणि जगासाठी शनी
शनीचा कुंभ राशीत प्रवेश झाल्याने देशात बांधकाम वाढेल. पाश्चिमात्य देशांमध्ये वाद वाढू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. खालच्या वर्गातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अशा लोकांना पदे आणि अधिकारही मिळू शकतात. मात्र, शेजारील देशांसोबत भारताच्या सीमेवर तणाव आणि वाद कायम राहतील.

शनीच्या प्रभावामुळे देशात मोठे कायदेशीर निर्णय घेता येतील. अवैध काम करणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते. जे लोक दीर्घकाळ मेहनत करत आहेत त्यांना या वर्षी यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

राजकीय, न्यायिक आणि घटनात्मक बाबींमध्ये वर्षभर शनीचा प्रभाव दिसून येईल, असे ज्योतिषींचे मत आहे. 5 फेब्रुवारीला शनि अस्त झाला होता. 10 मार्च रोजी 33 दिवसांनी उदय झाला आहे. उदय झाल्यामुळे शनीचा प्रभाव वाढेल. पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र सांगतात की, शनीला कठोर परिश्रम आणि प्रामाणिक कर्म आवडतात आणि त्याचे चांगले लाभही देतात. शनीची चाल राजकीय उलथापालथीची मानली जाते. (Astrology)

डिस्क्लेमर : वरील लेख माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

Axar Patel: अहमदाबादमध्ये सामना? मैं हूँ ना ! अंतिम सामन्याबाबत अक्षर पटेलकडून निर्धास्त राहण्याचा दिलासा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Success Story: गिरवीचा विशाल वाघ ठरला राज्यात अव्‍वल; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, सर्व स्तरांतून होतेय कौतुक

SCROLL FOR NEXT