Ambabai Temple esakal
संस्कृती

Ambabai Temple : 'तिरुपती'च्या प्रसादात आढळला चरबीचा अंश; आता अंबाबाईच्या लाडू प्रसादाचेही घेणार नमुने

Sharadiya Navratri Festival : अंबाबाई मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू कळंबा कारागृहातील (Kalamba Jail) बंदिजनांकडून तयार केले जातात.

सकाळ डिजिटल टीम

तिरुपतीतील प्रकारानंतर कळंबा कारागृह प्रशासन सतर्क झाले आहे. लाडू प्रसादासाठी उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. अन्न व औषध प्रशासनाकडून त्याची वेळोवेळी तपासणी केली जाते.

कोल्हापूर : यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या (Sharadiya Navratri Festival) पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple) येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून सव्वादोन लाखांहून अधिक लाडू तयार होणार आहेत. तिरुपती देवस्थानमधील (Tirupati Temple) प्रसादामध्ये भेसळीचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील लाडू प्रसादाचे नमुनेही अन्न व औषध प्रशासनाकडून घेतले जाणार आहेत.

अंबाबाई मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू कळंबा कारागृहातील (Kalamba Jail) बंदिजनांकडून तयार केले जातात. त्यातून आजवर शासनाला सात कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. अनेक बंदिजनांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे. श्री अंबाबाई मंदिराबरोबरच श्री जोतिबा मंदिरामध्ये लाडू प्रसादाचे भाविकांना वितरण केले जाणार आहे.

तिरुपतीतील प्रकारानंतर कळंबा कारागृह प्रशासन सतर्क झाले आहे. लाडू प्रसादासाठी उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. अन्न व औषध प्रशासनाकडून त्याची वेळोवेळी तपासणी केली जाते. मात्र, त्यानंतरही उत्सव काळात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून लाडूचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT