Shattila Akadashi 2023 esakal
संस्कृती

Shattila Akadashi 2023 : आज आहे षटतिला एकादशी, या दिवशी चुकूनही करू नका या 5 चुका

जो या दिवळी भगवान विष्णूला तिळ अर्पण करण्याबरोबर स्वत:ही तिळाचे सेवन करतो त्याच्या सगळ्या अडचणी दूर होतात असे म्हटले जाते

सकाळ ऑनलाईन टीम

Shattila Akadashi 2023 : आज षटतिला एकादशी आहे. आजच्या दिवशी भगवान विष्णूला तिळ अर्पण केले जाते. जो या दिवळी भगवान विष्णूला तिळ अर्पण करण्याबरोबर स्वत:ही तिळाचे सेवन करतो त्याच्या सगळ्या अडचणी दूर होतात असे म्हटले जाते.

या दिवशी विधीवत भगवान विष्णूची पूजा करावी. त्याने फायदा होतो. चला तर या एकादशीच्या व्रत नियमांबाबत जाणून घेऊया.

  • षटतिला एकादशीला चुकूनही करू नका या चूका

  • षटतिला एकादशीला चुकूनही वांगी किंवा भात खाऊ नका.

  • या दिवशी मांस मटन किंवा मद्यपान करू नका.

  • या दिवशी बेडवर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपा.

  • या दिवशी तोंडातून अपशब्द काढू नका.

  • या दिवशी सकाळी दात घासणे चांगले असते. या दिवशी झाडाच्या फांद्या किंवा पाने अजिबात तोडू नका.

एकादशीला आवर्जून करा ही कामे

  • षटतिला एकादशीला तिळाच्या दानाला विशेष महत्व आहे. तिळापासून बनलेल्या वस्तूही तुम्ही दान करू शकता.

  • या दिवशी भगवान विष्णूला तिळ अर्पण करणे शुभ असते.

  • या दिवशी संकल्प घेणाऱ्या व्यक्तींनी तिळाचं उटणं किंवा तिळाच्या पाण्याने स्नान करायला हवं.

  • षटतिला एकादशीलैा व्रतकथा ऐकल्यानंतर तिळ अर्पण केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो.

महत्व

वर्षभरात एकूण २४ एकादशी असतात. प्रत्येक एकादशीचं स्वत:चं वेगळं महत्व आहे. वैदिक शास्त्रात एकादशी व्रताला सगळ्यात मोठ्या व्रताचा दर्जा दिला गेलाय.

(डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT