Shravan 2022 Pune Loni Kalbhor Mahadev temple 
संस्कृती

Shravan : पुणे, पांडवकालीन महादेव मंदीरात "नागराज" अवतरले

थेट महादेवाच्या पिंडीला वेटोळे घालुन भाविकांना दर्शनही दिले...

सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर : महादेवांच्या पिंडीवर नागराज वेटोळे घालुन बसलेले दृष्य आपण अनेक वेळा हिंदी अथवा मराठी चित्रपटात पाहिलेले असेल, पण लोणी काळभोरच्या शेकडो शिवभक्तांना मात्र हा नजारा याची देही- याची डोळा पाहायला मिळाला. शुक्रवारी दुपारी लोणी काळभोर येथील पांडवकालीन महादेव मंदीरात अचानक "नागराज" अवतरले, व त्यांनी थेट महादेवाच्या पिंडीला वेटोळे घालुन मंदीरात येणाऱ्या शेकडो भाविकांना दर्शनही दिले.

भगवान महादेव व नागराज यांचे नाते काय आहे हे आपण हिंदी-मराठी चित्रपटात पहाण्याबरोबरच अनेक कथा-कांदबंऱ्यात वाचत आलो आहोत. याबाबत अनेक कथाकांदबऱ्यात तर भऱभरुन लिहलेही गेले आहे. मात्र हे प्रत्यक्ष पहाण्याचे भाग्य आत्तापर्यंत फारच थोड्या लाकांना लाभले आहे. यात लोणी काळभोर येथील शिवभक्तांचाही नंबर लागला आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजनेच्या सुमारास लोणी काळभोर येथील पांडवकालीन महादेव मंदीराचे विश्वस्त सुरेश पर्वतराव काळभोर यांना ते भाग्य सर्वप्रथम लाभले. त्यांनी ही बाब मंदीरात येणाऱ्या भाविकांना दाखवली. त्यानंतर शेकडो भविकांनी नागराजांचे दर्शन घेतले.

लोणी काळभोर इथलं हे शिवालय पांडवकालीन असल्याचं बोललं जातं. सुमारे 50 वर्षांपूर्वी या मंदिराच्या आसपासच्या जागेची परिश्रमपूर्वक स्वच्छता आणि कायापालट करून मंदिराला प्रकाश झोतात आणण्याचं काम श्री सुरेश पर्वतराव काळभोर ऊर्फ महाराज यांनी केलं. आजूबाजूच्या वृक्षांच्या लागवडीमुळे मंदरांचा परीसर प्रेक्षणिय आहे. या मंदिरातलं शिवलिंग, हे पांडवकालीन आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या दारात, लक्ष्मी नारायणाची त्या काळात कोरलेली मूर्ती, हे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

जीर्णोद्धाराच्या वेळी स्थापित केलेली नंदीची मूर्तीही, अखंडपणे एका दगडातून, कोरीव कामाने बनवलेली आहे. मंदिरासमोर सतत अग्नि पेटता ठेवलेला असतो. अशा वातावरणात नागराजाने भाविकांना दर्शन दिल्याने, लोणीकाळभोर परीसरात भावीकांत मंदीराबाबत श्रध्दा आनखीनच वाढली. हा व्हीडीओ अनेकांनी आपल्या सोशल मिडीयामधुन व्हायरलही केल्याचे दिसुन आले.

याबाबत अधिक माहिती देतांना हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर म्हणाले, लोणी काळभोर येथील महादेवाचे मंदीर पांडवकालीन आहे. या मंदीरात हजारो भाविक रोज दर्शनाला येत असतात. त्यातच काल (शुक्रवारी) दुपारी दोन वाजनेच्या सुमारास नागराजाने थेट महादेवाच्या पिंडीला वेटोळे घालुन, नागराजांचे भाविकांना दर्शन दिले.

नागराज मंदीरात तासभर बसुन होते. त्यांनी मंदीराचे विश्वस्त सुरेश काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या जवळ जाऊनही, त्यांना दर्शन देण्याचा प्रयत्न केला. तब्बल तासभरानंतर गावातील सर्पमित्रांनी नागराजांना पकडुन, शेजारीत झाडात सोडुन दिले. वरील प्रकरणामुळे आमची श्रध्दा आनखीनच वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

Chandu Chauhan : ‘सर्जिकल स्ट्राइक’मधील वादग्रस्त चंदू चव्हाण अटकेत; पोलिसांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Updates : खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांचं 'बंदूक फोटोशूट', ‘शो ऑफ’ चांगलंच अंगलट आलं, गुन्हा दाखल

पाय फ्रॅक्चर झाल्यावरही नृत्याच्या कार्यक्रमासाठी जिद्दीने उभी राहिली अभिनेत्री; "फक्त मनात ठरवता.."

SCROLL FOR NEXT