Shravan 2022 Shri Chandreshwar Sansthan
Shravan 2022 Shri Chandreshwar Sansthan 
संस्कृती

Shravan 2022 : श्री चंद्रेश्वरचा शिवलिलामृतामध्ये उल्लेख

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : महाशिवरात्री सुरू होण्याची घटना जिथे घडली ते शिवलिलाम्रुता मध्ये वर्णन असलेले व्याधाचा उद्धार करणारे श्री चंद्रेश्वर संस्थान तालुक्यातील चान्डस येथे आहे. तिथे महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

व्यमाधाचा उद्धार करण्याची व शिवरात्रीचे माहात्म्य शिवलीला म्रूतामध्ये वर्णन केलेले आहे . शिकारीच्या शोधात छोट्या तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या बेलाच्या झाडावर पारधी बसलेला असतो त्याच्या द्रुष्टीच्या आड येणारी बेलाची पाने खाली तोडून टाकतो. ती जमिनीमध्ये असलेल्या शिवलिंगावर पडून बेलाचा अभिषेक घडला व श्री शंकर प्रसन्न झाले. त्यांनी त्या पारध्याचा (व्याधाचा ) उद्धार केला. तेथून महाशिवरात्री पर्वास सुरवात झाली ही कथा जिथे घडली ते ठिकाण म्हणजे श्री चंद्रेश्वर संस्थान होय.

हे मंदिर पूर्वाभिमुख आहे गर्भग्रूहाम्ध्ये श्री चंद्रेश्वरांचे शिवलिंग आहे. मंदिराचे बांधकाम दक्षिण भारतीय पध्दतीचे आहे. मंदिरासमोर सभामंडप आहे. त्यामध्ये शिववाहन नंदीची मुर्ती आहे सभामंडपात श्री रामदेव बाबांची मूर्ति आहे. मंदिर परिसरात श्री कृष्ण मंदिर , श्री गजानन महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी यांची मंदिरे आहेत. मंदिरालगत बाराही महिने पाणी असलेली बारव (विहीर ) आहे. तिचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मंदिरासाठी आकर्षक प्रवेशद्वार बांधण्यातआलेआहे मालेगाव- मेहकर राज्यमहा मार्गावर मालेगाव पासून १० किमी अंतरावर हे संस्थान आहे.

श्रावण महिन्यात व महाशिवरात्रिला येथे भाविक मोठया संख्येने दर्शनास येतात महाशिवरात्रीला येथे यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते या तीर्थ क्षेत्राचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करावा. त्यामुळे भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतील. परिसरातील लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असॆ सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिलीप बोरकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT