सण श्रावणातले Esakal
संस्कृती

Shravan 2023 : यंदा दोन महिन्यांसाठी श्रावणमास, मंगळागौर, श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधन, सणांची रेलचेल

हिंदू पंचांगानुसार १८ जुलै २०२३ पासून श्रावणाला सुरूवात होईल तर १५ सप्टेंबरला श्रावण मासारंभ असेल. म्हणजेच यंदाच्या वर्षी जवळपास २ महिने महादेवाची पूजा आणि सेवा करण्याचं भाग्य भक्तांना लाभलं आहे

Kirti Wadkar

पावसाळा Monsoon सुरु झाल्यानंतर साधारण जुलै महिना सुरू झाला की वेध लागतात ते श्रावण मासाचे. श्रावण महिना सुरु झाला की सुरुवात होते ती म्हणजे विविध सणांना Festivals . खरं श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. Shravan 2023 Know about Festival in Coming Months

कारण श्रावण महिना हा महादेवाला प्रिय असल्याने तो महादेवाला समर्पित करण्यास आला आहे. श्रावण महिन्यात Shravan महादेवाची मनोभावे पूजा केल्याने महादेवाचा Lord Mahadev आशीर्वाद कायम राहतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.

या वर्षाची खासियत म्हणजे यंदाच्या वर्षी श्रावणमास हा २ महिन्याचा असणार आहे. यंदा अधिक महिना आल्याने श्रावणमास हा ५९ दिवसांचा असणार आहे. जवळपास १९ वर्षांनी एवढ्या मोठ्या कालावधीसाठी म्हणजेच २ महिन्यांचा श्रावण असणार आहे.

हे देखिल वाचा-

हिंदू पंचांगानुसार १८ जुलै २०२३ पासून श्रावणाला सुरूवात होईल तर १५ सप्टेंबरला श्रावण मासारंभ असेल. म्हणजेच यंदाच्या वर्षी जवळपास २ महिने महादेवाची पूजा आणि सेवा करण्याचं भाग्य भक्तांना लाभलं आहे.

श्रावणी सोमवार

श्रावणामध्ये विविध सण Festivals साजरे केले जात असतात. मात्र खास करून या काळामध्ये महादेवाला प्रसन्न कऱण्यासाठी श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं. प्रत्येक सोमवारी उपवास करुन भगवान महादेवाला बेलपत्र वाहून, अभिषेक करून महादेवाची भक्तीभावे पूजा केली जाते. यंदा श्रावणामध्ये ९ श्रावणी सोमवार आले आहेत. २४ जुलैला पहिला श्रावणी सोमवार असेल तर ११ सप्टेंबरला शेवटचा श्रावणी सोमवार असेल.

हे देखिल वाचा -

मंगळागौर

श्रावणात श्रावणी सोमवारासोबत उत्साहात साजरी केली जाते ती म्हणजे मंगळागौर. दर मंगळवारी नव विवाहित किंवा विवाहित स्त्रिया मंगळागौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा करतात. लग्नानंतर अनेक महिला लग्नाला ५ वर्ष पूर्ण होईपर्यंत मंगळागौर करतात.

इतर नवविवाहित महिला आणि सौभाग्यवतींना बोलावून मंगळागौर साजरी केली जाते. सौभाग्य कायम राहण्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी मंगळागौरीचं पूजन केलं जातं. अलिकडे तर मोठ्या थाटामाटात अनेक स्त्रीया एकत्रित येत झिम्मा फुगड्या खेळत मंगळागौर साजरी करतात.

श्रावणातील महत्वाचे सण

नागपंचमी- श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये या दिवशी नागाची पूजा केली जाते. यंदाच्या वर्षी २१ ऑगस्टला नागपंचमी साजरी केली जाईल.

कल्कि जयंती- श्रावण शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी कल्कि जयंती साजरी केली जाते. यंदा अधिक मास असल्याने २२ ऑगस्टला कल्कि जंयती साजरी केली जाईल.

हिंदू धर्मानुसार कल्कि हा भगवान विष्णूंचा शेवटचा म्हणजेच १० वा अवतार आहे. मात्र या अवताराचा जन्म अद्याप झालेला नाही. मात्र या दिवशी कल्कि जयंती साजरी केली जाते.

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा- यावर्षी ३० ऑगस्टला नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन साजरा करण्यात येईल. मोठ्या उत्साहात कोळी बांधव सागराला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करतात.

तर बहिण आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधून बहिण-भावंड्याच्या नात्याचा रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मात आनंदाने साजरा केला जातो.

कृष्णजन्माष्टमी- ६ सप्टेंबरला कृष्णजयंती म्हणजे कृष्णजन्माष्टमी साजरी केली जाईल. बाल- गोपाळांसाठी लहानसा झुला तयार करून आनंदाने कृष्णजन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजे दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो.

बैलपोळा आणि पिठोरी अमावस्या- महाराष्ट्रातील गावागावांध्ये शेतकरी आपल्या लाडक्या सर्ज्या-राजाच्या जोडीला नटवून थटवून त्यांनी मिरवणूक काढून बैलपोळा साजरा करतात. शेतात नांगर ओढणाऱ्या बैलाप्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

तर याच दिवशी येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हंटलं जात. या वर्षी १४ सप्टेंबरला हे सण साजरे केले जातील.

हे देखिल वाचा-

अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार आणि मंगळगौर व्रत करून महादेव- पार्वती मातेचं पूजन केलं जात. तर याच महिन्यात महादेवाला प्रिय असलेल्या नागाची देखील पूजा केली जाते.

बहिण-भावाच्या नात्याला रेशीम बंधाने घट्ट केलं जातं. तर ज्याच्या पोटातील असंख्य माशांमुळे कोळी बांधवांचं पोट भरतं या सागराची देखील पूजा केली जाते.

तसंच बळीराज्याच्या खांद्यांचा भार हलका करून शेतात नांगर फिरवणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणूनच हिंदू धर्मामध्ये श्रावणाला पवित्र आणि अत्यंत महत्वाचं स्थान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi : साई बाबांच्या नगरीत हे काय सुरुय? संस्थानच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत मोठी खळबळ, धक्कादायक कारण समोर, पाहा VIDEO

Suryakumar Yadav: '... तर मला भारताच्या वनडे संघाचंही कर्णधारपद मिळालं असतं', सूर्यकुमार नेमकं काय म्हणाला? वाचा

Latest Marathi News Live Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

दिवाळी गिफ्ट काय द्यावं हेसुद्धा कळेना! पंढरपूर विठ्ठल मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला चिकन मसाला, BVG कंपनीचा अजब कारभार

Pune - Nashik हायवेवर 'ट्राफिक जाम'ची दिवाळी! प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT