Shravan 2023  esakal
संस्कृती

Shravan 2023 : पुरुषोत्तम मास संपला, आजपासून महादेवाच्या आराधनेचा श्रावण महिना सुरू

श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या आराधनेला महत्व का आहे, जाणून घेऊया.

धनश्री भावसार-बगाडे

Why Worshiping Lord Shankar In The Month Of Shravan Is Important :

यंदा अधिक मास श्रावण महिन्याला लागून आल्याने भाविकांना दुहेरी पर्वणी मिळाली. पवित्र श्रावणाला जोडून आलेल्या पवित्र अधिकमास हा विशेष योग १९ वर्षांनी यंदा जुळून आला. त्यामुळे याला अधिक श्रावणमास म्हटले गेले. त्यामुळे यंदा ४ ऐवजी ८ श्रावणी सोमवार मानले गेले.

पण अधिकमास हा अत्यंत शुभ महिना मानला जात असला तरी या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. शिवाय हा महिना पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या काळात भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्व देण्यात आले आहे.

बुधवारी अधिकमास समाप्ती झाली आहे. आणि श्रावणाची सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा खास करून भगवान शंकर म्हणजे महादेवाला समर्पित असतो. म्हणून या काळामध्ये महादेवाची विशेष पूजा केली जाते. भगवान महादेवांना श्रावण महिना हा अत्यंत प्रिय आहे. म्हणून श्रावणामध्ये खास करून श्रावणी सोमवारचे व्रत करून महादेवाला प्रसन्न करता येतं. या काळात महादेवांची पूजा केल्यास त्याची कृपादृष्टी राहते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

म्हणून महादेवांना प्रिय आहे श्रावण

पुराणातील कथेनुसार जेव्हा दक्षपुत्र सतीने आपले प्राण त्यागले, तेव्हा महादेवांवर दु:खाचा डोंगर कोसळला. ते घोर तपस्येमध्ये लीन झाले. त्यानंतर सतीने हिमालय पुत्री पार्वतीच्या रुपामध्ये जन्म घेतला आणि महादेव आपले पती व्हावे म्हणून कठोर तप केलं. पार्वतीच्या भक्तीवर प्रसन्न होवून महादेवाने तिची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी पार्वतीशी विवाह केला.

महादेव आणि पार्वती माता या मासामध्ये म्हणजेच महिन्यात एकत्र आल्याने हा महिना महादेवांसाठी प्रिय मानला जातो. म्हणून या महिन्यात महादेवांसोबत माता पार्वतीची देखील पूजा केली जाते. म्हणूनच श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारच्या व्रतासोबतच मंगळागौर साजरी करत माता पार्वतीचंही पूजन केलं जातं.

श्रावणातील शिव महात्म्य

श्रावण महिन्याबद्दल पुराणामध्ये विविध कथा आढळतात. अर्थात या विविध कथांमधून महादेवांच्या भक्तीचा महिमा किंवा महादेवाच्या पूजेचं महत्व अधोरेखित केलं जातं.

काही पौराणिक कथांमधील वर्णनानुसार श्रावण महिन्यातच महादेवाने समुद्र मंथन केलं होतं. यावेळी समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल म्हणजेच विष प्राशन करून महादेवाने सृष्टीचं आणि देवांचं रक्षण केलं.

विष प्यायल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या कंठात साठवलं. त्यानंतर या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी महादेवांवर जलाभिषेक केला. म्हणूनच श्रावणमासामध्ये महादेवांचा अभिषेक केला जातो आणि त्यांना प्रसन्न केलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Mira Bhayandar Morcha : 'परप्रांतीयांनी मोर्चा काढला, त्यांचा हेतू वाईट नव्हता, पण मनसेचा..'; आमदार मेहतांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता!

Latest Maharashtra News Updates : "लाज असल्यास मंत्रीपदाचा राजीनामा द्या" - राजन विचारे

Pimple Gurav News : निम्मे सीसीटीव्ही कॅमेरे ‘दृष्टीहीन’ देखभालीचा अभाव; सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमधील सुरक्षा ऐरणीवर

Yash Dayal: यश दयालच्या विरोधात FIR दाखल, होऊ शकते १० वर्षांची शिक्षा! तक्रार करणाऱ्या महिलेने पुरावेही केले सादर

Kolhapur Accident : साहिलवर होती कुटुंबाची जबाबदारी, कुरिअर सेवेनंतर विकायचा बिर्याणी; पार्सल देऊन लवकर येतो म्हणून गेला अन्...

SCROLL FOR NEXT