Shravan 2024 esakal
संस्कृती

Shravan 2024: हर हर महादेव.! पहिल्या श्रावणी सोमवारी 'अशा' पद्धतीने करा महादेवांचा अभिषेक, व्हाल संकटमुक्त

Shravan Aarti Shiv Puja Ritual: पहिल्या श्रावणी सोमवारी महादेवांची खास पूजा केली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Shravan 2024 : श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जातो. भगवान शंकरांना प्रिय असणारा हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. याच महिन्यात भगवान शंकर आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते. श्रावणात सण-उत्सव आणि विविध प्रकारच्या व्रतवैकल्यांची नुसतीच रेलचेल पाहायला मिळते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे.

यंदा हा श्रावण महिना दक्षिण भारतीय पंचांगानुसार, महाराष्ट्रात ५ ऑगस्टला (सोमवारी) सुरू होणार आहे. श्रावणात अनेक जण भगवान शंकराची उपासना करतात. सोमवार हा दिवस भगवान शंकरांना समर्पित आहे. त्यामुळे, श्रावणात सोमवारचे महत्व आणखी अधोरेखित होते.

अनेक जण श्रावणी सोमवारचा उपवास करतात. या दिवशी महादेवांची खास पूजा केली जाते आणि त्यांचा अभिषेक केला जातो. हा अभिषेक केल्याने महादेवाची आपल्यावर कृपा राहते, असे मानले जाते. श्रावणी सोमवारी महादेवांचा अभिषेक करण्याची पद्धत काय आहे? चला तर मग जाणून घेऊयात.

पहिल्या श्रावणी सोमवारी अशा पद्धतीने करा अभिषेक :

  • पहिल्या श्रावणी सोमवारी (५ ऑगस्टला) पहाटे लवकर उठून स्नान करा.

  • स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा.

  • त्यानंतर, देवघरातील शिवलिंग उत्तर दिशेला स्थापित करा.

  • आता या शिवलिंगावर गंगाजलाचा अभिषेक करा.

  • त्यानंतर, दूध, दही आणि तूपाने महादेवाच्या शिवलिंगाला अभिषेक घाला.

  • या दरम्यान अभिषेक करताना मंत्रांचा जप करा.

  • त्यानंतर, शेवटी पुन्हा गंगाजलाने शिवलिंगाचा अभिषेक करा.

  • आता शिवलिंगाच्या पिंडीवर महादेवांचे आवडीचे भस्म लावा.

  • पांढरी फुले आणि बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा.

  • तुमच्याकडे रूद्राक्ष असेल तर तुम्ही रूद्राक्षाची माळ देखील शिवलिंगावर ठेवू शकता.

  • आता दिवा लावून, महादेवांची आरती करा आणि शिवलीलामृत स्तोत्राचे पठण करा.

  • शेवटी, महादेवांना दूध-साखरेचा नैवेद्य दाखवा.

रूद्राभिषेक मंत्र

महादेवाला रूद्राभिषेक करताना खालील मंत्राचा जरूर जप करा.

ॐ त्र्यम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।

उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

रूद्राभिषेक केल्यानंतर करा दान

श्रावणी सोमवारी महादेवाला रूद्राभिषेक केल्यानंतर तुम्ही गरिबांना अन्नदान, वस्त्रदान करू शकता. यासोबतच तुम्ही पैशांच्या रूपात ही दान करू शकता. हे दान केल्यामुळे भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते आणि आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT