Shravan 2024  esakal
संस्कृती

Shravan 2024 : पहिला श्रावणी सोमवार कधी? व्रत करताना आरोग्याची 'अशी' घ्या काळजी?

Shravan 2024 : श्रावणात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Shravan 2024 : हिंदू धर्मामध्ये श्रावण या महिन्याला विशेष असे महत्व आहे. श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. भगवान शंकरांना प्रिय असणारा हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. श्रावणात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते. याच महिन्यात विविध प्रकारचे सण आणि उत्सव येतात. या महिन्यात केली जाणारी व्रतवैकल्ये अतिशय फलदायी मानली जातात.

उत्तर भारतात उत्तर भारतीय पंचांगानुसार २२ जुलैलाच श्रावण महिना सुरू झाला आहे तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार ५ ऑगस्ट (सोमवारी) २०२४ ला श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे.

यंदा महाराष्ट्रात पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत हे ५ ऑगस्टला (सोमवारी) केले जाईल. हे श्रावणी सोमवारचे व्रत करताना आरोग्याची कशी काळजी घ्यायची? कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? चला तर मग जाणून घेऊयात.

फलाहार करा

श्रावणी सोमवारच्या उपवासाला व्रत करताना काही जण उपवासाचे खाद्यपदार्थ खातात तर काही जण निरंकार उपवास करतात. या दिवशी सामान्य अन्नाचे सेवन करण्यास मनाई आहे. परंतु, जास्त वेळ जर तुमचे पोट रिकामे राहिले तर तुम्हाला गॅस आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो.

त्यामुळे, या समस्या टाळण्यासाठी फलाहार करावा. या दिवसांमध्ये विविध प्रकारची ताजी फळे मिळतात. तुम्ही ही फळे नक्कीच खाऊ शकता. यामुळे, तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुमचे व्रत ही पूर्ण होईल.

पाणी भरपूर प्या

श्रावण महिन्यात पावसाच्या सरी बरसतात. या दिवसांमध्ये संततधार पाऊस पडतो. परंतु, या पावसामुळे वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे, घाम येतो आणि डिहायड्रेशन होऊ शकते.

त्यामुळे, यापासून सुटका करण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. जर तुम्ही पाणी नाही प्यायले तर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते आणि चक्कर येऊ शकते. त्यामुळे, श्रावणी सोमवारचे व्रत करताना पाणी भरपूर प्या.

उपवासाचे खाद्यपदार्थ खा

श्रावणी सोमवारचे व्रत करताना उपवासाचे खाद्यपदार्थ जसे की, राजगिऱ्याच्या पीठाची भाकरी, साबुदाण्याची खिचडी, बटाट्याचा चिवडा, दही, बटाट्याचे उपवासाचे पदार्थ, इत्यादी खाद्यपदार्थ खाल्ले जातात. हे खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. परंतु, जास्त प्रमाणात या खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा.

जास्त शारिरीक मेहनत करू नका

श्रावणी सोमवारच्या उपवासाचे व्रत करताना अधिक काम करणे टाळावे. जर तुम्ही जास्त शारिरीक मेहनत घेतली तर तुम्हाला थकवा येऊ शकतो. त्यामुळे, दिवसभर तुम्हाला अशक्तपणा देखील जाणवू शकतो. तसेच, वारंवार भूक लागू शकते. त्यामुळे, श्रावणी सोमवारच्य दिवशी व्रत करताना अधिक प्रमाणात शारिरीक मेहनत करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरलं! 'वैद्यकीय पदवी नसताना चालवला दवाखाना'; तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा, अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया

Pune News: शीव, पाणंद, रस्त्यांची गावदप्तरी नोंद होणार; जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे समितीची राज्य सरकारला शिफारस

'मी जेवणात उंदीर खाल्लाय' 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, 'हे ऐकून माझ्या....'

Ahilyanagar Crime:'सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले'; अकोले तालुक्यात उडली खळबळ

Latest Marathi News Live Updates : रायगडमध्ये तूफान पाऊस, रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT